डॉ.जयदीप पवार चिंचोडी पाटीलचे भूषण – सभापती इंजि.प्रविण कोकाटे
अगदी कमी वयामध्ये फार्मसी मध्ये पीएच.डी.पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ.जयदीप पवार यांचा चिंचोडी पाटील पंचक्रोशीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
प्रा.जयदीप पवार यांनी सनराईज विद्यापीठ येथून फार्मसी विषयात पीएच.डी.पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे. ‘औषधाच्या घन अवस्थेतील विद्राव्यता व स्थैर्य सुधारण्याचा अभ्यास’ या विषयावरील संशोधनाबद्दल नुकतीच त्यांना पदवी प्रदान करण्यात आली. डॉ.पवार यांनी आपले संशोधन कार्य अत्यंत चिकाटीने व सातत्यपूर्ण अभ्यासातून पूर्ण केले.या संशोधनाच्या कालावधीत त्यांना डॉ. मिश्रा यांचे मोलाचे मार्गदर्शन गाईड म्हणून लाभले.
या कामगिरीबद्दल चिंचोडी पा.पंचक्रोशीच्या वतीने डॉ.जयदीप पवार यांचा सन्मान मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती बाबासाहेब गुंजाळ,मा.सरपंच राजुशेठ हजारे,मच्छिन्द्र खडके,शिवसेना नेते डॉ.मारुती ससे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गीतांजली हॉस्पिटलचे संचालक डॉ.विजय पवार,मा.प्राचार्य हरिभाऊ कोकाटे,सेवानिवृत्त शिक्षक बाबासाहेब पवार,ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर ठोंबरे,प्रशांत कांबळे,सोसायटी संचालक महेश पा.जगताप,बबनराव कोकाटे,कामधेनू पतसंस्था व्हा.चेअरमन प्रमोद पवणे,अनिल चव्हाण,गणेश वाडेकर,चक्रपाणी ठोंबरे,नुसरत सय्यद,शैलेश देवकर,किशोर घोडके,मच्छिन्द्र दळवी,ज्येष्ठ नागरिक संघांचे कल्याण पा.जगताप,सुदामराव करांडे,दिनकर भोस,रामभाऊ ठोंबरे,गंगाधर देवकर,गणपत पवार,शंकर कोकाटे,गंगाधर दरेकर,नामदेव मोरे,बाबुराव शेळके, धर्मा हजारे गुरुजी,छबुराव कोकाटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


