नेप्तीत तुळजाभवानी पालखीचे उत्साहात स्वागत . हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ. अहमदनगर :नगर तालुक्यातील नेप्ती येथील तुळजाभवानी मंदिरात तुळजाभवानी मातेची पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती .पालखी भल्या पहाटे आली असतानाही गावातील महिला भगिनी, अबाल वृद्धनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन दर्शन घेतले .गावात पालखी वाजत गाजत, फुलांची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत दाखल झाली. ही मिरवणूक गावात भक्तीमय वातावरण निर्माण करून गेली. गावातील सर्वच जाती धर्माचे नागरिक या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि पालखीचे दर्शन घेतले. पालखीची आरती आणि पूजा होवून पालखी ,खळगा वस्तीवरील वैष्णवी माता मंदिराकडे कडे मार्गस्थ झाली. गावात पालखी आणण्यासाठी ग्रामस्थांनी कमी वेळात वेळात चांगले नियोजन केले आणि नागरिकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला. यानिमित्ताने सर्व गाव एकत्र आले होते .या पालखीच्या आगमनानिमित्त ग्रामस्थांनी घरासमोर सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या .
नेप्तीत तुळजाभवानी पालखीचे उत्साहात स्वागत .
यावेळी पालखीचे मुख्य मानकरी रवींद्र भगत , गावचे पुजारी बाबासाहेब जपकर, लहानु गवारे, राहुल गवारे, सोसायटी सदस्य वस्ताद बाबासाहेब पवार, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले, अतुल गवारे, गणेश जपकर , रावसाहेब कर्पे ,विजय कर्पे, अण्णा होळकर ,रघुनाथ चौरे ,निखिल भगत, भाऊसाहेब भगत ,महादेव पाचरणे ,मल्हारी चौरे व परिसरातील गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.