भूषणनगर, केडगाव येथे प्रभाग क्र १५ मध्ये भाजप उमेदवार दत्ता गाडळकर यांच्या प्रचाराचा नारळ; आमदार संग्राम जगताप ,शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहीते यांच्या उपस्थितीत शुभारंभ

भूषणनगर, केडगाव येथे प्रभाग क्र १५ मध्ये भाजप उमेदवार दत्ता गाडळकर यांच्या प्रचाराचा नारळ; आमदार संग्राम जगताप ,शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहीते यांच्या उपस्थितीत शुभारंभ
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग१५ चे भाजपचे उमेदवार दत्ता गाडळकर यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ भूषण नगर, केडगाव येथे उत्साहात पार पडला. आमदार संग्राम भैया जगताप, जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार संग्राम भैया जगताप यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, केडगाव व भूषण नगर परिसरातील पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, वीज व इतर मूलभूत नागरी समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील. नागरिकांचे प्रत्येक प्रश्न विकासकामांच्या माध्यमातून मार्गी लावले जातील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भक्कम युती ही केवळ राजकीय नसून विकासाची युती आहे, हे आता नागरिकांच्या लक्षात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना उमेदवार दत्ता गाडळकर म्हणाले की, भाजप–राष्ट्रवादी युतीने शहराच्या विकासासाठी ठोस भूमिका घेतली असून या युतीमुळेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. विकासकामांचा अनुभव, सक्षम नेतृत्व आणि पारदर्शक कारभार यामुळेच नागरिक सतर्क झाले असून येत्या निवडणुकीत भाजप–राष्ट्रवादी युतीला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या व अपेक्षा मांडल्या. विकासाभिमुख नेतृत्वाला संधी देण्याचा निर्धार नागरिकांनी यावेळी व्यक्त केला. केडगाव व भूषण नगर परिसरात भाजप–राष्ट्रवादी युतीच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून आगामी निवडणुकीत ही युती विजयी होणार, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *