संविधान वाचविण्यासाठी ११ हजारांची मदत !

 संविधान वाचविण्यासाठी ११ हजारांची मदत !

बौध्दाचार्य संजय कांबळे यांनी आ. लंकेेंकडे केला धनादेश सुपूर्द 
आरपीआय आंबेडकर गटाचा लंकेंना पाठींबा
 
नगर : प्रतिनिधी 
     देशाचे संविधान वाचले पाहिजे अशी भूमिका घेत बैध्दाचार्य संजय कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांना ११ हजार रूपयांचा निवडणूक निधी दिला. दरम्यान आर पी आय आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या आदेशान्वये या पक्षाचा निलेश लंके यांना पाठींबा जाहिर करण्यात आला आहे. 
     शेखर पंचमुख यांनी सांगितले की, बहुजनांना अभिमान वाटेल असे काम बौध्दाचार्य संजय कांबळे हे करीत असून संविधान राहते की नाही अशी स्थिती निर्माण  झालेली असताना संजय कांबळे यांनी पुढाकार घेत सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून नावलौकीक प्राप्त झालेले तसेच कोरोना संकटात हजारो रूग्णांना उपचार देउन त्यांना जीवनदान देणारे नीलेश लंके यांना निवडणूक निधी म्हणून ११ हजार रूपयांची मदत दिली आहे. हा धनादेश आ. नीलेश लंके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 
    दरम्यान, येत्या १३ मे रोजी होणा-या नगर दक्षिण लोकसभा निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांना रिपक्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने पाठींबा जाहिर करण्यात आला असून तसे पत्र आ. नीलेश लंके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप मकासरे, जिल्हा संपर्क प्रमुख रोहित आव्हाड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दरोळे, युवक जिल्हाध्यक्ष रॉकी लोंढे, नगर तालुकाध्यक्ष मुसला धनगर, पारनेर तालुकाध्यक्ष किरण सोनवणे, नगर शहराध्यक्ष हरीश अल्हाट, सुवक शहराध्यक्ष संदीप वाघमारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जयाताई डोळस आदी पदाधिकाऱ्यांसह आंबेडकरी जनसमुदाय उपस्थित होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *