सचिव संघटनेच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष अहमदनगर जिल्हा फेडर संस्थेमध्ये सचिवांचे दोन प्रतिनिधी द्यावेत. सचिव भरती प्रक्रिया थांबविण्यात यावी सचिव संघटनेचे आंदोलन.
अहिल्यानगर – जिल्हास्तरीय समिती जाऊन जिल्हा केडरची रचना प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत सचिव संघटनेला डावण्यात येत असल्याचा गंभीर आरोप संघटनेचे नेते रामदास सोनवणे यांनी केला आहे. जिल्हा केडरच्या कामकाजात सचिव संघटनेचे किंवा दोन प्रतिनिधी सभासद म्हणून घेण्यात यावेत अशी कायद्यात तरतूद आहे. या मागणीला प्रशासनाने विरोध दर्शविल्यामुळे जिल्ह्यातील क्रांतीसुर्य सचिव संघटने कडून या प्रकियेला विरोध केला आहे. या मागणीसाठी जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन दिले आहे. मागणी पूर्ण न केल्यास आज दिनांक ६ जानेवारीपासून कामकाज बंद करण्याचा इशारा सचिव संघटनेने दिला आहे
क्रांतीसूर्य सचिव संघटना, अहमदनगर जिल्हा ही संघटना सन २०११ पासून सातत्याने कार्यरत असून सचिवांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सचिव संघटनेचे दोन प्रतिनिधी जिल्हास्तरीच केडर मध्ये घेण्यात यावे
या संदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे या मागणीबाबत वारंवार पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. मागण्या मान्य न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला.सचिवांवर अन्याय झाल्यास संघटना मागे हटणार नाही, असे ठाम मत संघटनेचे रामदास सोनवणे यांनी यावेळी सांगितले.
आशुतोष गावखरे म्हणाले यांनी सांगितले की, दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी शासनाने केडरची स्थापना केली, ज्यामध्ये नियमांनुसार विद्यमान संघटनेचे दोन प्रतिनिधी असणे बंधनकारक होते. मात्र संघटनेने सादर केलेल्या अर्जाला प्रशासनाने नकार दिला आणि कोणतीही चर्चा न करता थेट टेंडर प्रक्रिया सुरू केली.
याशिवाय, संबंधित ट्रेडर्सची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ही प्रक्रिया तत्काळ थांबवावी यासाठी जिल्हा सचिव व उपनिबंधक यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. भरती प्रक्रिया थांबवली नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी
संघटनेचे अध्यक्ष
संदिप बढे ,रामदास सोनवणे सरचिटणीस , गजानन शिंदे उपाध्यक्ष,संभाजी चव्हाण उपाध्यक्ष,अंबादास दातीर जिल्हास्तरीय समिती सदस्य ,आशुतोष गावखरे राज्य संघटना प्रतिनिधी,कुंडलिक बोडखे , दत्ताजी पतके , भरत पवार , लक्ष्मण गोसावी , सतीश कुदांडे , सोमनाथ निंभोरे , संतोष अकोलकर ,प्रकाश कडलग , बाबा भवर , विठ्ठल जावळे उपस्थित होते
चौकट-
संघटनेने स्पष्ट केले आहे की, आज दिनांक ६ तारखेपासून सर्व कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने दखल घेतली नाही तर पुढील टप्प्यात कायदेशीर मार्ग अवलंबण्यात येईल. या संपूर्ण परिस्थितीची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा ठाम पवित्रा संघटनेने घेतला आहे.
चौकट-
“या भरती प्रक्रियेमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा होत असून, हे गैरव्यवहार उघड होऊ नयेत म्हणूनच सचिव संघटनेला सभासद करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.”या प्रकरणामुळे जिल्ह्यातील सचिवांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रामदास सोनवणे


