सेवेला प्राधान्य, जनतेशी आपुलकीचे नाते – सुवर्णा दत्ता जाधव
संकट असो, अडचण असो किंवा तातडीची गरज – प्रभाग क्रमांक १५ (ब) मधील प्रत्येक भगिनी-बंधूसाठी सदैव उपलब्ध राहण्याची भूमिका सुवर्णा दत्ता जाधव यांनी घेतली असून, त्यांची हीच सेवा वृत्ती आज त्यांची ओळख बनली आहे.
राजकारणापेक्षा सेवा, औपचारिकतेपेक्षा आपुलकी आणि केवळ शब्दांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवत त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या सातत्याने करत आहेत.
जनतेशी जपलेली नाती हीच आपली खरी ताकद असल्याचे सांगत, मिळालेला विश्वास आणि सुरू असलेली सेवा अखंडपणे सुरू राहील, असा निर्धार सुवर्णा दत्ता जाधव यांनी व्यक्त केला आहे. “मी तुमची हक्काची लाडकी बहीण आहे,” या भावनेतून त्या प्रभागातील नागरिकांशी सतत संवाद साधत असून, त्यांच्या कार्यपद्धतीला नागरिकांकडून मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
सेवेच्या जोरावर आणि आपुलकीच्या नात्यावर उभे राहिलेले हे नेतृत्व प्रभाग १५ (ब) मध्ये विश्वासाचे प्रतीक ठरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
सेवेला प्राधान्य, जनतेशी आपुलकीचे नाते – सुवर्णा दत्ता जाधव


