प्रभाग क्रमांक १६ मध्ये विकासासाठी दत्ताभाऊ गाडळकरांना जनतेचा भक्कम पाठिंबा
अहिल्यानगर :
महानगरपालिका प्रभाग क्रमांक १६ मध्ये विकास कामांना गती देण्यासाठी दत्ताभाऊ गाडळकर यांना मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मागील काळात नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा करणारे आणि प्रत्यक्ष कामातून विश्वास संपादन करणारे नेतृत्व म्हणून गाडळकर यांची ओळख निर्माण झाली आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता तसेच नागरी सुविधांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन काम करणाऱ्या दत्ताभाऊ गाडळकर यांच्या माध्यमातूनच प्रभाग क्रमांक 16 मधील रखडलेली विकास कामे मार्गी लागतील, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या तत्काळ सोडवण्याचा प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
प्रभागातील नागरिक, व्यापारी, युवक व ज्येष्ठ नागरिक वर्गातून गाडळकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून “विकास हवा तर दत्ताभाऊ गाडळकर” अशी भावना मतदारांमध्ये बळावत असल्याचे दिसून येते. येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक 16 चा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी दत्ताभाऊ गाडळकर हेच सक्षम नेतृत्व ठरेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रभाग क्रमांक १६ मध्ये विकासासाठी दत्ताभाऊ गाडळकरांना जनतेचा भक्कम पाठिंबा


