निंबळक येथे भव्य सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा सुरवात
निंबळक-कला क्रिडा मंडळ व स्व . संजय लामखडे व स्व. विलास लामखडे यांच्या स्मरणार्थ निंबळक येथील ग्रीनहिल स्टेडियमवर भव्य सिझन बॉलचे उद्घाटन दिपक लंके, माजी जिल्हा परीषद सदस्य माधवराव लामखडे, उद्योजक अजय लामखडे यांच्या हस्ते करण्यात आले.
निंबळक ( ता. नगर ) येथे दिपावली निमित्त प्रत्येक वर्षी लामखडे परीवाराच्या वतीने भव्य सिझन बॉलचे आयोजन केले जाते. स्पर्धा भरविण्याचे हे ४४ वर्ष आहे या सामन्यासाठी महाराष्ट्रातून संध सहभागी होतात . दि. २ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर पर्यत हे सामने आहे १९ संघानी सहभाग नोंदविला आहे. मोठया प्रमाणात बक्षिसे ठेवण्यात आले असल्याचे अजय लामखडे यांनी सांगितले. यावेळी घनश्याम म्हस्के,
नाना दिवटे, बाबासाहेब पगारे, ग्रामपंचायत सदस्य
बाळासाहेब कोतकर उपसरपंच, अशोक कळसे
किसन तात्या कोतकर ,काळे साहेब संकेत गायके
महेश शेळके सोनवणे सर निलेश दिवटे कृष्णा गुंजाळ शुभम घोलप यावेळी उपस्थित होते.