वडिलांच्या विकासाचा वारसा, नव्या दमाचा राजकीय चेहरा; नवनागापूर गटात ऋतुजा जालिंदर कदम यांचा सघन जनसंपर्क दौरा

वडिलांच्या विकासाचा वारसा, नव्या दमाचा राजकीय चेहरा; नवनागापूर गटात ऋतुजा जालिंदर कदम यांचा सघन जनसंपर्क दौरा
अहिल्यानगर – नवनागापूर जिल्हा परीषद गटाच्या राजकारणात नव्या पिढीचे, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ऋतुजा जालिंदर कदम यांचे नाव वेगाने पुढे येत आहे. वडिलांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या ठोस विकासकामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत ऋतुजा कदम यांनी थेट जनतेशी संवाद साधण्याची प्रभावी मोहीम हाती घेतली आहे. केवळ आश्वासनांपुरते न थांबता, प्रत्येक गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष जाणून घेण्यावर त्यांनी भर दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवनागापूर जिल्हा परिषद गटातील गावोगावी ऋतुजा कदम यांच्या मतदार गाठीभेटी सुरू असून, या भेटींमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि महिला-सशक्तीकरण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली जात आहे. नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, त्यांच्या समस्या नोंदवणे आणि त्यावर व्यवहार्य उपाय सुचवणे ही कार्यपद्धती मतदारांमध्ये विश्वास निर्माण करत आहे.
या दौऱ्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘विकासाचा अजिंठा’ ही संकल्पना. भूतकाळातील कामगिरी, वर्तमानातील गरजा आणि भविष्यातील संधी यांचा मेळ घालत आपण कसा सर्वांगीण व शाश्वत विकास करू शकतो, याचे स्पष्ट चित्र ऋतुजा कदम नागरिकांसमोर मांडत आहेत. नियोजनबद्ध विकास, निधीचा योग्य वापर आणि प्रशासनाशी प्रभावी समन्वय यावर आधारित विकास मॉडेल त्यांनी लोकांसमोर ठेवले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, नवनागापूर गटात केवळ नावावर नव्हे तर कामावर विश्वास ठेवणारे नेतृत्व मतदारांना अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत वारसाहक्काचा अनुभव, नव्या विचारांची ऊर्जा आणि थेट जनसंपर्क यांचा संगम साधत ऋतुजा जालिंदर कदम आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत असल्याचे चित्र दिसत आहे. येत्या काळात त्यांच्या या संपर्क दौऱ्याचा मतदारांच्या निर्णयावर निश्चितच प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *