प्रभाग क्रमांक १६ मध्ये विकासाची विश्वासार्ह ओळख – ओंकार दिलीप सातपुते यांना मतदारांची प्रचंड पसंती
अहिल्यानगर -महानगर पालिका प्रभाग क्रमांक १६ मध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या ठोस विकासकामांमुळे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीत धावून जाणाऱ्या नेतृत्वामुळे ओंकार दिलीप सातपुते हे नाव आज घराघरात विश्वासाचे प्रतीक बनले आहे. शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून, त्यामुळेच या प्रभागात मतदारांची त्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, वीज, तसेच मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांवर ओंकार दिलीप सातपुते यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. प्रश्न फक्त मांडण्यापुरते न थांबता ते प्रत्यक्ष काम मार्गी लावण्यासाठी प्रशासनाच्या दारात ठामपणे उभे राहिले. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागले असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे कोणताही प्रश्न असो — गरीब, मध्यमवर्गीय, महिला, युवक किंवा ज्येष्ठ नागरिक — दिलीप सातपुते यांनी कधीही नागरिकांपासून अंतर ठेवले नाही. रस्त्यावर उतरून, थेट भेटीगाठी घेऊन समस्या ऐकून घेणे आणि तातडीने उपाययोजना करणे हीच त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. त्यामुळेच “अडीअडचणीत धावून येणारा नेता” अशी त्यांची ठाम ओळख प्रभागात तयार झाली आहे.
आज प्रभाग क्रमांक १६ मधील वातावरण पाहिले तर मतदारांमध्ये एकच चर्चा आहे — काम करणाऱ्या नेतृत्वालाच पुन्हा संधी द्यायची. विकासाची गती थांबू नये, प्रभागाची प्रगती कायम राहावी यासाठी नागरिकांचा कल स्पष्टपणे ओंकार दिलीप सातपुते यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
आक्रमक विकासाचा अजेंडा, जनतेशी थेट नाळ जोडलेले नेतृत्व आणि कामाची विश्वासार्हता या जोरावर ओंकार दिलीप सातपुते हे प्रभाग क्रमांक १६ मधील सर्वात मजबूत आणि लोकप्रिय उमेदवार म्हणून पुढे येत आहेत.
प्रभागाचा विकास, नागरिकांचा विश्वास आणि जनतेचा कौल — या त्रिसूत्रीमुळे ओंकार दिलीप सातपुते यांची वाटचाल अधिक भक्कम होत आहे


