शब्द विकासाचा, पाऊल प्रगतीचे; मिळून बदलूया रूप आपल्या प्रभागाचे!
प्रभाग १५ ब मध्ये भाजप–राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवार दत्ता गाडळकर यांना मिळतोय वाढता प्रतिसाद
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ ब मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (युती) चे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक १ – दत्ता सोमनाथ गाडळकर यांनी प्रचाराला वेग दिला आहे. कमळ हे निवडणूक चिन्ह घेऊन मैदानात उतरलेले दत्ता गाडळकर हे विकासाभिमुख, जनतेशी थेट संवाद साधणारे आणि कामाच्या जोरावर ओळख निर्माण करणारे उमेदवार म्हणून ओळखले जात आहेत.
“शब्द विकासाचा, पाऊल प्रगतीचे; मिळून बदलूया रूप आपल्या प्रभागाचे!” या प्रभावी घोषवाक्यासह गाडळकर यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत विकासाचा ठोस आराखडा मांडला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य, स्ट्रीट लाईट, महिला व युवकांसाठी विशेष योजना अशा मूलभूत प्रश्नांवर भर देत प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांचा निर्धार आहे.
युती सरकारच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा लाभ प्रभाग १५ ब पर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे दत्ता गाडळकर यांनी स्पष्ट केले. प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, “काम करणारा, ऐकून घेणारा आणि प्रश्न सोडवणारा उमेदवार” अशी त्यांची प्रतिमा मतदारांमध्ये दृढ होत आहे.
प्रभागाचा चेहरा बदलण्यासाठी अनुभव, युतीची ताकद आणि विकासाची स्पष्ट दिशा असलेले नेतृत्व आवश्यक असून, ते नेतृत्व दत्ता सोमनाथ गाडळकर यांच्या रूपाने मिळत असल्याची भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत अनुक्रमांक १ – कमळ या चिन्हाला मोठे मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.
शब्द विकासाचा, पाऊल प्रगतीचे; मिळून बदलूया रूप आपल्या प्रभागाचे!


