प्रभाग क्रमांक १६ – केडगावचा विकास म्हणजेच आमचा निर्धार! 🔥
महानगरपालिका प्रभाग क्रमांक १६ हा केडगावकरांच्या स्वप्नातील ‘कोथरूड’ करून दाखवणारच!
हा केवळ नारा नाही, तर भूषण गुंड, सागर सातपुते, सविता कराळे आणि विमल कांबळे यांनी घेतलेला ठाम संकल्प आहे.
केडगावमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्न, खराब रस्ते, अपुरी ड्रेनेज व्यवस्था, अस्वच्छता आणि नागरी सुविधांच्या अभावाला आता पूर्णविराम मिळणार आहे. नियोजनबद्ध विकास, मजबूत पायाभूत सुविधा आणि पारदर्शक कारभाराच्या जोरावर प्रभाग क्रमांक १६ ला आदर्श प्रभाग बनवण्याचा निर्धार या चौघांनी केला आहे.
💥 आता आश्वासनांचा काळ संपला आहे!
💥 काम करणाऱ्यांना संधी देण्याची हीच वेळ आहे!
“केडगावचा सर्वांगीण विकास, नागरिकांचा सन्मान आणि प्रत्येक घरापर्यंत सुविधा” हाच आमचा एकमेव अजेंडा असून, निवडून आल्यानंतर नाही तर निवडणुकीपूर्वीच विकासाची दिशा स्पष्ट केली आहे, असा ठाम विश्वास भूषण गुंड, सागर सातपुते, सविता कराळे आणि विमल कांबळे यांनी व्यक्त केला आहे.
🚩 केडगावकरांनो, बदल घडवायचा असेल तर ठाम निर्णय घ्या!
🚩 प्रभाग क्रमांक १६ – विकासासाठी एकजूट करा!


