प्रभाग क्रमांक १६ मधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार – अपक्ष उमेदवार सागर सातपुते, भूषण गुंड, सविता कराळे, विमल कांबळे
केडगाव महानगर पालीका हद्दीतील प्रभाग क्रमांक १६ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्धार अपक्ष उमेदवार सागर सातपुते व भूषण गुंड यांनी व्यक्त केला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधताना त्यांनी पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, वीज व मूलभूत नागरी सुविधांबाबत ठोस आराखडा मांडला आहे.
प्रभागातील अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने येणारे पाणी व उन्हाळ्यात निर्माण होणारी तीव्र टंचाई यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवीन पाईपलाईन, जलसाठा वाढवणे, गळती रोखणे व समान पाणीवाटपाची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन उमेदवारांनी दिले आहे.
पाण्याबरोबरच प्रभागातील खराब रस्ते, तुंबलेली गटारे, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, पथदिव्यांची दुरवस्था, तसेच नागरी आरोग्य व स्वच्छतेचे प्रश्नही प्राधान्याने सोडवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “नागरिकांच्या दारात जाऊन प्रश्न ऐकणारा आणि काम करून दाखवणारा प्रतिनिधी देणे, हाच आमचा उद्देश आहे,” असे सागर सातपुते व भूषण गुंड, सविता कराळे, विमल कांबळे यांनी सांगितले.
केडगाव परिसरात आतापर्यंत झालेल्या विविध विकासकामांचा अनुभव व विश्वासार्ह कामगिरी याच जोरावर प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या प्रचारात दिसून येत आहे. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक व व्यापारी वर्गातून या अपक्ष उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून “विकासासाठी अपक्ष” अशी भावना मतदारांमध्ये बळावत आहे.
निवडून आल्यानंतर केवळ आश्वासने न देता प्रत्यक्षात काम करून दाखवू, आणि प्रभाग क्रमांक १६ आदर्श बनवू, असा ठाम विश्वास सागर सातपुते व भूषण गुंड सविता कराळे, विमल कांबळे यांनी व्यक्त केला आहे
प्रभाग क्रमांक १६ मधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार – अपक्ष उमेदवार सागर सातपुते, भूषण गुंड, सविता कराळे, विमल कांबळे


