प्रभाग क्र. ८ मधून निवडणूक लढवण्याची राणीताई सुनिल भालेराव यांची घोषणा
प्रभाग क्रमांक ८ मधील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आगामी निवडणुकीत उमेदवारी दाखल करणार असल्याची घोषणा राणीताई सुनिल भालेराव यांनी केली आहे. परिसरातील मूलभूत सोयी, महिलांचे प्रश्न, नागरिकांचे प्रलंबित विषय आणि स्थानिक विकासकामे यांना गती देण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राणीताई भालेराव म्हणाल्या की, “सामान्य माणसाचा आवाज बुलंद करणे, त्यांचे प्रश्न प्रशासनासमोर प्रभावीपणे मांडणे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे प्राधान्य राहणार आहे.”
प्रभागातील नागरिकांनीही त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत त्यांना सक्रिय, प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. आगामी निवडणुकीत प्रभाग क्र. ८ मध्ये रंगत वाढण्याची चिन्हे या घोषणेनंतर स्पष्ट झाली आहेत.


