_सरपंच परिषदेच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील सरपंच प्रत्येक गावात धरणे आंदोलन करणार-_*
*_-सरपंच परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष सरपंच शरद पवार,_*
*_सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांनी_* *_काल मुंबई,आझाद मैदान येथे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची अमानुषपणे निर्गुण हत्या केल्याप्रकरणी आरोपींना त्वरित फास्टट्रॅक कोर्टाकडून मोक्का लावून फाशी व्हावी व परिवाराला न्याय मिळावा._* _या मागणीसाठी_
*_सरपंच परिषदेतील महाराष्ट्र राज्यातील हजारो सरपंच यांनी आझाद मैदान,मुंबई येथे धरणे आंदोलन धरून सदर घटनेचा तीव्र निषेध केला._*
_यावेळी_ *_अहिल्यानगर जिल्ह्याचे सरपंच परिषदचे कार्याध्यक्ष तथा चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींना त्वरित फाशी द्या, व आरोपींना सहकार्य करणाऱ्या बदमाश मंत्र्यांचे राजीनामे घ्या._*
_राज्यातील विधानसभेतील_
*_288आमदार पैकी लोकनेते आ.सुरेशआण्णा धस,संदीप भैया शिरसागर,जितेंद्र आव्हाड,प्रकाश दादा सोळंके, हे चार आमदारच_*
*_मस्साजोग गावच्या सरपंचाच्या हत्तेबद्दल भूमिका मांडताना दिसतात बाकी 284 यावर बोलायला का तयार नाहीत, राज्यातील अनेक गावातील सरपंच स्वतःचे कार्य_* *_बजावत असताना त्यांच्यावर हल्ला झाल्यास 353 त्वरित दाखल करावा, व यासह सरपंच परिषदेच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील प्रत्येक गावात धरणे आंदोलन धरले जाईल,_*
*_सदर स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड बाबत विधानसभेत व बीड,परभणी,पुणे येथील मोर्चात सुरेशआण्णा धस व यांच्यासह चार आमदारांनी आक्रमक भूमिका बजावल्या_* *_बद्दल त्यांचे राज्यातील सर्व सरपंच व परिषदेच्या वतीने आभार मानले,व सरपंच शरद पवार यांनी त्यांचे एक वर्षाचे मानधन स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मुलांना देणार व अनेक सरपंचांना भाषणे चालु असताना व सदर घटनेचे वास्तव मांडताना अश्रू अनावर झाले,चिचोंडी पाटील ग्रामपंचायत 1 दिवस ग्रामपंचायत अत्यावश्यक सेवा सोडता कामकाज बंद ठेवून सदर घटनेचा निषेध करणार असल्याचे सांगितले,_*
_व चिचोंडी पाटील_ *_ग्रामपंचायत पदाधिकारी,सर्व ग्रामस्थ,व आझाद मैदान आंदोलन स्थळी उपस्थित मा .सरपंच दिलीपभाऊ पवार,उपसरपंच विश्वसागर कोकाटे,गटनेते वैभव कोकाटे,संदीप काळे,दत्तू धुळे व तालुक्यातील सर्व सरपंच यांच्या वतीने,,_*
*_स्वर्गीय सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली_*
*_वाहण्यात आली._*