प्रभाग क्रमांक ८ : राणीताई भालेराव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीचा निर्धार
अहिल्यानगर – प्रभाग क्रमांक आठमध्ये नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि विकासाचा वेग वाढवणे हे अग्रक्रम ठेऊन राणीताई सुनील भालेराव यांनी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या निर्णयामागे आमदार संग्राम भैया जगताप यांचे मार्गदर्शन तसेच माजी नगरसेवक कुमारभाऊ वाकळे यांचे थेट सहकार्य लाभत असल्याचे राणीताई भालेराव यांनी सांगितले. पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाचा पाठिंबा आणि प्रभागातील नागरिकांचा विश्वास हीच माझी ताकद असल्याचे त्या म्हणाल्या.
प्रभाग क्रमांक आठमध्ये मूलभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, महिलांचे प्रश्न तसेच सर्वसामान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याचा आपला संकल्प आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राणीताईंच्या उमेदवारीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.


