नवनागापूर गटातून सौ. सोनुबाई विजयराव शेवाळे यांना उमेदवारीसाठी नागरिकांचा वाढता पाठिंबा
अहिल्यानगर – “काम करत आलोय, काम करत राहू… वारसा विकासाचा, सर्वांगीण प्रगतीचा” या घोषणेसह वडगावगुप्ता येथील प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ. सोनुबाई विजयराव शेवाळे यांचे नाव जिल्हा परिषद नवनागापूर गटातून पुढे करण्यात येत असून परिसरातील नागरिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
सौ. शेवाळे यांनी सरपंच म्हणून काम करताना ग्रामविकास, रस्ते-कामे, स्वच्छता उपक्रम, महिला सक्षमीकरण, पाणीपुरवठा व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांच्याबद्दल जनमानसात विश्वास निर्माण झाला आहे. पारदर्शक प्रशासन, लोकाभिमुख निर्णय आणि विकासाभिमुख दृष्टीकोन ही त्यांची वैशिष्ट्ये असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नवनागापूर गटात सर्वांगिण विकासाला गती देण्यासाठी सक्षम महिला नेतृत्वाची गरज असल्याचे कार्यकर्त्यांचे मत असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सौ. सोनुबाई शेवाळे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी एकमुखाने व्यक्त केली आहे.
सौ. शेवाळे यांच्या उमेदवारीमुळे गटातील विकासकामांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला असून त्यांच्या नावाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.


