जनतेच्या मनातील जनसेवक – बोलून नाही, करून दाखवणारी नेतृत्वशैली!- सौ.शिलाताई अनिल शिंदे ( प्रथम महापौर )
अहिल्यानगर : “नुसते आश्वासन नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून परिवर्तन” — ही ओळख निर्माण करणाऱ्या सौ. शिलाताई अनिल शिंदे आणि श्री. अनिल माधवराव शिंदे यांनी आज अहिल्यानगरच्या राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
प्रथम महिला महापौर म्हणून सौ. शिलाताई अनिल शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी ठोस पावले उचलत नागरिकांचा विश्वास संपादन केला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि नागरी सुविधांसाठी त्यांनी केलेले कार्य आज परिवर्तनाची साक्ष देत आहे. “नुसतं बोलून नाही, तर करून दाखवले” अशी भावना आज सर्वसामान्य जनतेच्या मनात ठामपणे रुजलेली दिसते.
तर दुसरीकडे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अनिल माधवराव शिंदे हे संघटन कौशल्य, आक्रमक भूमिका आणि तळागाळातील जनतेसाठीच्या लढ्यामुळे ओळखले जातात. पक्ष संघटनेपासून ते विकासकामांच्या पाठपुराव्यापर्यंत त्यांनी घेतलेला पुढाकार अहिल्यानगरच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरत आहे.
आज “परिवर्तन घडतंय, विकासाचं धनुष्य चालतंय” ही भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, शिंदे दाम्पत्याच्या कार्यावर जनतेचा विश्वास अधिकच दृढ होत आहे. जनसेवेचा वसा जपत दोघेही विकासाच्या मार्गावर भक्कम पावले टाकत असल्याने, येणाऱ्या काळात अहिल्यानगरच्या प्रगतीला नवे बळ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


