वार्ड क्रमांक पंधरामध्ये विकासासाठी दत्ता गाडळकर यांच्यासारख्या नव्या चेहऱ्याची गरज
वार्ड क्रमांक पंधरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असून नगरविकासाच्या दृष्टीने हा भाग अद्यापही मागे पडलेला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, वीजपुरवठा यांसारख्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना होणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर वार्डातील सर्वसामान्य नागरिक दत्ता गाडळकर यांच्यासारखा कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व विकासाभिमुख नवा चेहरा नेतृत्वासाठी पुढे यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. दत्ता गाडळकर यांनी यापूर्वी सामाजिक कार्यातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी पुढाकार घेतला असून त्यांच्या कार्याची दखल परिसरात घेतली जाते.
“वार्डाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राजकीय स्वार्थापेक्षा लोकहिताला प्राधान्य देणारे नेतृत्व हवे,” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक पंधरामध्ये नव्या चेहऱ्याला संधी देण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.


