अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक : प्रभाग १३ (ड) मध्ये अमोल सानप यांची जनतेकडून अपेक्षेने वाटचाल
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ (ड) मध्ये राजकीय वातावरण तापले असून, सर्वसामान्य नागरिकांतून आलेले उमेदवार अमोल किसन सानप यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.
अ.क्र. ४, चिन्ह – बासरी या निवडणूक चिन्हावर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
गरीब हमालाच्या कुटुंबातून संघर्ष करत पुढे आलेले अमोल सानप हे उमेदवार “सर्वसाधारण एक संधी गरीब हमालाच्या लेकाला…!” या भावनिक सादेसह जनतेसमोर गेले असून, त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
अमोल सानप यांचे राजकारण हे पद, प्रतिष्ठा किंवा सत्तेसाठी नसून निस्वार्थ सेवा, मूलभूत प्रश्नांचे निराकरण, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि गरजवंतांना तत्काळ मदत या मूल्यांवर आधारित आहे. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, गटारी, स्वच्छता, वीज, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे त्यांनी सातत्याने लक्ष वेधले आहे.
“प्रभागाचा संपूर्ण विकास, पारदर्शक कारभार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी थेट रस्त्यावर उतरून लढणे हेच माझे ध्येय आहे,” अशी भूमिका अमोल सानप यांनी मांडली आहे. विकासात्मक कामांबरोबरच युवकांना रोजगार, महिलांचे सक्षमीकरण आणि वंचित घटकांसाठी ठोस योजना राबवण्याचा त्यांचा संकल्प आहे.
राजकीय घराणेशाहीपासून दूर राहून, जनतेच्या बळावर निवडणूक लढवणाऱ्या या उमेदवाराकडे प्रभागातील युवक, कामगार, गरीब व मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या आशेने पाहत आहेत. “काम करणारा आणि आमच्यातीलच प्रतिनिधी हवा” अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे.
आता येत्या निवडणुकीत बासरी चिन्हावर मतदार काय कौल देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, प्रभाग १३ (ड) मध्ये ही लढत विशेष रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.


