प्रभाग ११ मध्ये काँग्रेसच्या पुढाकारातून मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात ;
नव मतदारांना नोंदणीचे, तर जुन्या मतदारांना दुरुस्ती करून घेण्याचे जरीवालांचे आवाहन
——————————————————–
नगर : लोकसभा, विधानसभा, महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रभाग ११ मध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला यांच्या पुढाकारातून शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नव मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जरीवाला यांनी पुढाकार घेऊन प्रभागातील मतदारांसाठी नवीन मतदारांना नाव नोंदणीची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच अनेक मतदारांच्या मतदान कार्डामध्ये चुका आहेत. या निमित्ताने नागरिकांना त्या दुरुस्त देखील करून घेता येणार आहेत. जरीवाला यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन काळे यांनी शुभारंभ प्रसंगी बोलताना केले आहे.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक तथा ओबीसी विभाग शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, साफसफाई कामगार विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष गणेश चव्हाण, अल्पसंख्यांक काँग्रेस विभाग शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सलीमभाई जरीवाला, जब्बार मोमीन, फैयाज शेख, अलीम तांबोली, सादिक बागवान, फिरोज शेख, मुबीन शेख, साहिल सय्यद, अजहर बागवान, मोहसीन शेख, अर्श शेख, शाहरुख सय्यद, इमाम भाई, रफिक भाई, अज़ीम पिंजारी, प्रीतम बलदोटा, साद बेग, सैफ सय्यद, शब्बीर शेख आदींसह परिसरातील नागरिक मोट्या संख्येने उपस्तिथ होते.
जरीवाला यावेळी म्हणाले प्रभाग 11 मध्ये अठरा वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे मात्र मतदान मतदार नोंदणी कशी करायची याबद्दल त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली नाही म्हणूनच प्रभागात काँग्रेसच्या वतीने जनसंपर्क कार्यालयामध्ये नागरिकांसाठी ही सोय उपलब्ध करून दिली आहे सातत्यपूर्ण नोंदणी सुरू राहणार आहे त्यामुळे अठरा वर्षे पूर्ण केलेले नवीन मतदार केव्हाही येऊन आपले नाव नोंदवू शकतात नोंदणी शाखा आणि मतदार यांच्यामध्ये या निमित्ताने समन्वय साधून मतदानाचा हक्क नवीन मतदारांना मिळवून देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
तसेच अनेक मतदारांच्या ओळखपत्रांमध्ये वय, लिंग याबाबतच्या किरकोळ चुका असल्याचे अनेक मतदारांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्या देखील दुरुस्त करण्याची प्रक्रिया या अभियानामध्ये केली जात आहे. नागरिकांनी प्रभागातील नागरिकांनी यासाठी काँग्रेसच्या 9673555556 या मतदार नोंदणी क्रमांक हेल्पलाइनवर नि:संकोचपणे संपर्क साधावा, असे आवाहन अलतमश जरीवाला यांनी केले आहे.
——————————