सेवानिवृत्त शिक्षक हबीब शेख यांचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मान
आहिल्यानगर- सेवानिवृत्त झाल्यानंतरही शिक्षकांनी आपल्या ज्ञानदानाचा उपयोग समाज हितासाठी करावा. याचा फायदा समाज सुधारणासाठी होईल असे प्रतिपादन रघुनाथ लोंढे यांनी केले
भोयरे पठार ( ता. आहिल्यानगर ) येथील भाग्योदय माध्यमिक विघालयाचे मुख्याध्यापक
आदर्श शिक्षक हबीब शेख हे नुकतेच प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी उदयनराजे कोतकर,आदित्यन राजे कोतकर, श्रुतिका संदीप कोतकर संस्थेचे सल्लागार रघुनाथ लोंढे, संस्थेचे संचालक इंजि. प्रसाद आंधळे, इंजि.राजेंद्र शेळके , मुख्याध्यापक शिवाजी घाडगे,,भोयरे खुर्द चे सरपंच राजू आंबेकर भोयरे पठार चे सरपंच बाबा टाकले उपस्थित होते. यावेळी उदयनराजे कोतकर म्हणाले
हबीब शेख सरांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. गोरगरिब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवर मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे ते केवळ शिक्षक नव्हे तर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जात होते.हबीब शेख म्हणाले विद्यार्थ्यांच्या यशातच आपले खरे समाधान असल्याचे सांगितले. “शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबा गायकवाड , विजय शेवाळे, ज्ञानदेव बेरड,मार्केट कमिटीचे माजी संचालक संजय शिंदे, देवराम कोल्हे, ज्ञानेश्वर कोतकर जयसिंग दरेकर, गणेश पांडुरंग सातपुते, सागर सातपुते , फरहत शेख सलमान पठाण, रऊफ शेख, अकिल सर, शकिल शेख, शंकर मुठे इत्यादी मान्यवर


