ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोठेही कमी पडणार नाही – आमदार निलेश लंके..
वाकोडी येथे १०.५० कोटींच्या कामांचे लोकार्पण…
देविदास गोरे.
रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील वाकोडी येथे आमदार निलेश लंके यांच्या निधीतून १०.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.नगर – पारनेर मतदारसंघात वाळकी , अरणगाव , टव देहरे , निंबळक जिल्हा परिषद गटातील अनेक गावे जोडलेली आहेत. मतदारसंघात येणाऱ्या गावांसाठी लाखो रुपयांचा निधी देऊन विकास कामांवर भर दिला आहे.नगर तालुक्यातील गावांना कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही.आगामी काळात लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी जनतेच्या समस्यांचा विचार केला जाईल.गेल्या चार वर्षाच्या काळात आमदार फंडातील आणि इतर विशेष निधीतून मोठा निधी मिळवला आहे.अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने अनेक राहिलेल्या विकास कामांना गती मिळणार आहे. जनतेने मला आमदार केले त्यांच्या उपकरातून उतरायी होण्यासाठी कोठेही कमी पडणार नाही असे विधान निलेश लंके यांनी केले. वाकोडी तालुका नगर येथे विविध विकास कामांचे लोकार्पण निलेश लंके यांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी ते बोलत होते.माझ्या हातात अजून एक वर्ष आहे.ग्रामविकासाच्या अनेक योजना मार्गी लावुन ग्रामीण विकासावर भर दिला जाईल असेही लंके म्हणाले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले , बाळासाहेब हराळ , माजी सभापती हरिभाऊ कर्डिले , सरपंच मंगल गवळी , उपसरपंच अजिनाथ मोढवे , चेअरमन मुरलीधर गोरे , विठ्ठल दळवी , अरुण इनामकर , गणेश तोडमल , रमेश इनामकर तसेच इतर आजी – माजी पदाधिकारी , ग्रामस्थ , मान्यवर उपस्थित होते.