आयुष्याचे खरे शिक्षण खेळाच्या मैदानावरच मिळते.- जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे
स्लग – तुम्ही नशीबवान, 160 वर्षाचा इतिहास असणाऱ्या संस्थेत शिकत आहात
नगर प्रतिनिधी – अहमदनगर एज्युकेशन सोसायटी संस्थेला 160 वर्षाची परंपरा आहे. स्वातंत्र्य चळवळी बरोबरच ऐतिहासिक,सामाजिक, राजकीय वारसा आहे. अशा संस्थेत तुम्ही शिक्षण घेत आहात त्यामुळे तुम्ही नशीबवान आहात. शाळेतील वर्गात बौध्दिक ज्ञान मिळते. पण जीवनात आयुष्य जगतानाचे खरे शिक्षण हे मैदानावरच मिळत असते. असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांच्या संयुक्त खेळाच्या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, सल्लागार मंडळाचे सदस्य भूषण भंडारी, मीनाताई बोरा, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे प्राचार्य उल्हास दुगड, रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य अजय बारगळ, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य प्रभाकर भाबड, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य संदीप उबाळे, नवीन मराठी शाळा विश्रामबागच्या मुख्याध्यापिका मीना पवार, किशोर संस्कृत संवर्धिनी शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला कळमकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की शाळेतील वर्गात फक्त बौद्धिक ज्ञान मिळते पण नियोजन, सांघिक कार्य, सर्वांना सोबत घेऊन जाणे, नेतृत्व कौशल्य, सुसंवाद, हे सर्व गुण खेळाच्या मैदानावरच विकसित होतात आणि तेच जीवनात उपयोगी पडतात. खेळात आणि जीवनात कधीच कोणाला कमी लेखू नये.जिंकणाऱ्या खेळाडू व संघ यांनी नम्रता अंगी ठेवली पाहिजे. पराभूत होणारा खेळाडू सुद्धा अनुभव घेऊन जात असतो. आयुष्यात मेहनतीला पर्याय नाही असेही सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया म्हणाल्या की शालेय अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांची मानसिकता सुदृढ राहिली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया खेळातूनच भरला जातो. दूरदृष्टीच्या या हेतूनेच भूतपूर्व प्रमुख कार्यवाह अशोकभाऊ फिरोदिया यांनी कायम खेळाला प्राधान्य दिले होते. संस्थेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी दिली.
यावेळी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश मिळवणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यासाठीचे यादीवाचन गणेश मोरे यांनी केले. सर्व शाळांच्या संचलन पथकाचे नेतृत्व कादंबरी मोढवे हिने तर क्रीडा शपथ मानसी वाबळे या विद्यार्थिनीने दिली. संचलन आदेश विकास साबळे यांनी दिले.पाहुण्यांचा परिचय उल्हास दुगड यांनी करून दिला. क्रीडा अहवाल वाचन प्रभाकर भाबड यांनी तर आभार अजय बारगळ यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सतीश गुगळे आणि भीमा धनगर यांनी केले.
चौकट – संचलन आणि बँड पथकाचे कौतुक
यावेळी संस्थेतील सर्व शाळांचे मुले आणि मुली यांच्या 11 पथकांनी शिस्तबद्ध संचलन करत जिल्हा पोलिस अधिक्षक आणि इतर पाहुण्यांना मानवंदना दिली. क्रीडा ज्योत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी मैदानात आणली.त्यावेळी संस्थेच्या रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या शालेय घोष पथकाने अप्रतिम वादन केले. बँड पथकास रविंद्र पंडित यांचे मार्गदर्शन होते.यामुळे वातावरण भारावून गेले होते.संचलन, शालेय घोष पथक आणि सर्व खेळाडूंचे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी कौतुक केले.
फोटो ओळी – अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या शाळांच्या संयुक्त खेळ मेळाव्याचे उद्घाटन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, सल्लागार मंडळाचे सदस्य भूषण भंडारी, मीनाताई बोरा,सर्व शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी…(फोटो ..अजित गोसकी)


