दरेवाडी गटातून उद्धव कांबळे यांनी उमेदवारी करावी सर्वसामान्य नागरिकांची मागणी
दरेवाडी – सर्वसामान्यांचा आवाज
दरेवाडी परिसरातील सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळख असलेले कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक उद्धवराव कांबळे यांना यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत उभे राहावे अशी स्थानिक नागरिकांची ठाम प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
उद्धवराव कांबळे यांनी गेल्या काही वर्षांत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्यावर सर्वसामान्यांचा दृढ विश्वास निर्माण झाला आहे. सामाजिक कार्य, पायाभूत सुविधा, शेतकरी बांधवांच्या अडचणींवर तत्परतेने काम, तसेच सर्वांना समान न्याय देणारा त्यांचा दृष्टिकोन यामुळे ते लोकांच्या मनात घर करून आहेत.
गावातील नागरिक, शेतकरी, युवक व महिलांकडून मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता उद्धवराव कांबळे यांना जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी अशी एकमुखी मागणी होत असून त्यांच्या उमेदवारीमुळे गटाला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या या चर्चेमुळे आगामी राजकीय घडामोडींना वेग येणार इतके मात्र निश्चित.


