आहिल्यानगर (प्रतिनिधी): निंबळक जिल्हा परिषद गटातून पोपटराव घुंगार्डे यांच्या उमेदवारीला स्थानिक कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षाला निश्चितच बळ मिळणार असल्याची चर्चामत स्थानिक नागरिकामध्ये सुरूआहे.
घुंगार्डे यांची निंबळक गटातील गावपातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये चांगली पकड, विविध सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग आणि जनसंपर्कातील सातत्य लक्षात घेता पक्षाच्या उमेदवारीमुळे गटात विजयाची संधी अधिक मजबूत झाल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
पक्षाच्या वाढीसाठी निष्ठेने काम करणारा चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून विकासकामांवर त्यांचा भर आणि सर्वसमावेशक नेतृत्वशैलीमुळे आगामी निवडणुकीत त्यांची निवड पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
चास ग्रामपंचायती सरपंच पदावर तसेच सदस्य असताना सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी काम केले . सर्व सामन्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी शासन स्तरावर नेहमी प्रयत्न केला शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामन्य नागरिकापर्यत पोहचविण्याचे काम केले. त्यानी केलेले काम नक्कीच पक्ष उमेदवारी साठी फायदयाचे ठरणार आहे पक्षानी कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांला संधी घ्यावी.


