केंद्रात–राज्यात भाजपची सत्ता; निधीची कमतरता नाही, विकासकामे मार्गी लागतील – दत्ता गाडळकर

केंद्रात–राज्यात भाजपची सत्ता; निधीची कमतरता नाही, विकासकामे मार्गी लागतील – दत्ता गाडळकर

आहिल्यानगर – ❙ केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. प्रभाग १५ मधील प्रलंबित तसेच नवी विकासकामे जलद गतीने मार्गी लावली जातील, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता गाडळकर यांनी व्यक्त केला.

गाडळकर म्हणाले की, प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, उदयान, नाना नानी पार्क, महिला व युवकांसाठी उपयुक्त योजना यांना आता गती मिळणार आहे. “आपल्या जनतेने दिलेल्या विश्वासाचा मान ठेवत पारदर्शकता व प्रामाणिकपणे विकास साधणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असेही ते म्हणाले.

केंद्र–राज्य सरकारांकडून विविध योजनांसाठी मिळणारा निधी प्रभावीपणे गावात पोचवून सर्वसामान्यांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा निर्धारही गाडळकर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *