सव्वा वर्षाच्या सभापतीपदाच्या कार्यकाळात भरीव कामगिरी – सुरेखा गुंड
नगर तालुक्यातील विकासाचा नवा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचायत समितीच्या सभापती सौ. सुरेखा संदिप गुंड यांनी सव्वा वर्षाच्या कार्यकाळात उल्लेखनीय आणि लोकाभिमुख कामे करून विकासाला नवे बळ दिले आहे. पदभार स्वीकारताच “कार्यकाळात ठोस बदल घडवायचे” या ध्येयाने सुरेखा गुंड यांनी पायाभूत सुविधांपासून महिला सक्षमीकरणापर्यंत अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवले. या विश्वासाच्या जोरावर केकती गणातून निवडणुक लढवत आहे आपली साथ मोलाची आहे.
या कालावधीत रस्ते विकास, पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवणे, शाळा दुरुस्ती, अंगणवाडी सुधारणा, आरोग्य शिबिरे, महिलांसाठी स्वयंसाहाय्य गटांना चालना देणे, नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद, प्रशासनात पारदर्शकता आणि गावोगाव विकासकामांना वेग देणे अशी अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
सुरेखा गुंड व संदिप गुंड यांनी प्रत्येक गावात नियमित दौरे करून लोकसंपर्क वाढवला. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष पाहून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात त्या नेहमी पुढे राहिल्या. विशेषतः महिलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी ठोस पावले उचलली.
गावातील वरिष्ठ नागरिक, शेतकरी, महिला आणि युवकांनी त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत “सव्वा वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे करणारी लोकाभिमुख सभापती” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सुरेखा गुंड यांनी पुढील काळातही विकासाची ही गती अधिक वेगाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले आहे.


