–
बुऱ्हाणनगर गणातून सौ.आश्विनी अमोल जाधव यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी
बुऱ्हाणनगर गणात आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सौ.आश्विनी अमोल जाधव यांचे नाव मोठ्या जोमाने पुढे येत आहे. विविध घटकांमधील ग्रामस्थ, महिला बचत गट, तरुण मंडळी तसेच स्थानिक ज्येष्ठ नागरिकांकडून जाधव यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी सातत्यपूर्ण मागणी होत आहे.
ग्रामविकास, महिलांच्या प्रश्नांवरील सक्रिय सहभाग, अनमोल प्रतिष्ठान मार्फत केलेल्या सामाजिक उपक्रमाचे तसेच आदिवासी समाजाकरीता चालू केलेल्या निवासी आश्रमशाळेचे काम लक्षवेधी आहे.तसेच सर्वसामान्यांशी निगडित राहून केलेली कामे यामुळे आश्विनी जाधव यांच्याविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्पाणीपुरवठा, रस्ते, महिला सक्षमीकरण आणि शैक्षणिक उपक्रमांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून याचा फायदा थेट नागरिकांना झाला आहे.
“बुऱ्हाणनगर गणाचा विकास वेगाने व्हावा आणि सर्वसमावेशक कामे घडून यावी, यासाठी आश्विनी ताई योग्य उमेदवार आहेत,” असा सूर ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांना संधी देण्यात यावी, अशी जनतेची तीव्र मागणी होत आहे.
अमोल जाधव यांची राजकीय पार्श भूमि तसेच त्यांनी या पुर्वी लढवलेली २०१२ ची जेऊर जि.प. निवडणूक व २०१४ ची विधानसभा निवडणूक तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना युवक तालुका अध्यक्ष म्हणून केलेल् संघटन व राजकीय कौशल्य पाहता. बुर्हाणनगर गणातील राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर रंगतदार झाले असून आश्विनी अमोल जाधव यांची उमेदवारी जाहीर होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


