भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटीलचे माजी सरपंच  मनोज कोकाटे यांनी चिचोंडी पाटील गणातून उमेदवारी करावी !”

“भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटीलचे माजी सरपंच   मनोज कोकाटे यांनी चिचोंडी पाटील गणातून उमेदवारी करावी !”

भाजप कार्यकर्त्यांचा एकमुखी आग्रह..

चिंचोडी पाटील -नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गणात आगामी पंचायत समिती निवडणुकीची चर्चा रंगात आली असून, या गणातून भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तसेच चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोज कोकाटे यांनी उमेदवारी करावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी होत आहे.

मनोज कोकाटे यांनी आपल्या दोन वर्षांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात गावात उल्लेखनीय विकासकामे केली आहेत. रस्ते बांधणी, पाणीपुरवठा योजना, स्वच्छता उपक्रम, ग्रामसौंदर्यीकरण आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी गावाचा सर्वांगीण विकास साधला.

भाजपचे माजी तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी, कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तसेच भाजपमधील सर्वच नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा घनिष्ठ संवाद असल्याने पक्षाची विचारधारा आणि विकासाचे ध्येय तळागाळापर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

कोरोना काळातही कोकाटे यांनी चिचोंडी पाटील गाव आणि ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहिमेदरम्यान केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय ठरले. आरोग्य विभागाशी सातत्याने समन्वय ठेवून नागरिकांना रुग्णसेवा देण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली.

या सर्व कामगिरीच्या पार्श्वभूमीवर, नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गणातील भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मनोज कोकाटे यांना या गणातून भाजपची उमेदवारी करावी अशी जोरदार मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *