निंबळक-
निंबळक बायपास चौक ते एमआयडीसी या रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी या मागणीसाठी मा.उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा देताच सार्वजनिक विभागाने मंजुरीचे आदेश दिल्याने रस्ता रोको स्थगित करण्यात आला. टेंडर ची मुदत संपवून दोन महिने झाले लोकप्रतिनिधीच्या मर्जीतील ठेकेदाराला नसल्यामुळे काम रखडले असल्याचा आरोप डॉ. दिलीप पवार यांनी केला.
निंबळक बायपास चौक ते एमआयडीसी सावली हॉटेल पर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. ह्या रस्त्याबाबत डॉ दिलीप पवार यांनी वारवांर पाठपुरावा केला, आंदोलन केले. या रस्त्यासाठी एक कोटी रूपये निधी मंजुर झाला. त्याची निविदा काढण्यात आली आणि त्याची मुदत नोव्हेबर संपली. ह्या वेळी पात्र कंपनीला संबधीत कामासाठी आदेश देणे आवश्यक होते .निविदा आदेश अंतिम दिनांक दोन होऊन सुद्धा सदर प्रक्रियेत दोन महीने विलंब झाला कारण ह्या निविदेत सात लोकांनी निविदा भरल्या होत्या , परंतु लोकप्रतिनिधी यांच्या मर्जितला ठेकेदार नियुक्त होत नव्हता. त्यामुळे दोन महिने होऊन सुद्धा काम सुरु झाले नाही. उबाठा सेनेने रास्ता रोकोचा इशारा देताच यंत्रणा खडबडून जागी झाली. आणि कार्यारम्भ आदेश तात्काळ दिल्याने आंदोलन न करताच यश मिळाल्याने परीसरातील ग्रामस्थांची अडचण दूर होणार आहे. यापूर्वी येथे दोन लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि अनेक गंभीर अपघात झाले आहेत .आठ दिवसाच्या आत कामाला सुरवात झाली नाही तर कुठलेही निवेदन न देता ह्याच ठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी परत देण्यात आला. यावेळी सा.बां.चे उपविभागीय अधिकारी डोंगरे , शाखा अभियंता चव्हाण , यांनी कार्यारंभ आदेश पंचायत समिती मा उपसभापती डॉ.दिलीप पवार, दिपक शिरसाठ, अशोक शिंदे, संतोष गेरंगे, शिवाजी सोनवणे, सुभेदार गोविंद पाड़ळे, दत्तात्रय दिवटे , बालकृष्ण कोतकर, निलेश पाडळे, छबुराव गायकवाड, बी.डी.कोतकर. यांना दिला.