चिचोंडी पाटील गणातील भाजप-महायुतीचे शक्तिप्रदर्शन
सर्व इच्छुकांचा निर्धार: “पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्यालाच विजयी करणार!”
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे भारतीय जनता पक्ष व महायुतीची विचारविनिमय बैठक अतिशय उत्साहपूर्ण आणि संघटनात्मक शक्तीचे प्रदर्शन ठरली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत गणातील सर्व इच्छुक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भक्कम ऐक्य दाखवले.
बैठक सुरू होण्यापूर्वी लोकप्रिय दिवंगत आमदार श्री.शिवाजीराव कर्डीले साहेब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवून पक्षाच्या विजयासाठी काम करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
या बैठकीचे आयोजन भाजपचे माजी तालुकाध्यक्ष व चिचोंडी पाटील गावचे माजी सरपंच श्री.मनोज कोकाटे यांच्या पुढाकाराने, तसेच चिचोंडी पाटील गणातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव करण्यात आले.
बैठकीत सर्व इच्छुकांनी एकमुखाने ठरविले की “पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वजण निष्ठेने एकदिलाने काम करतील.” गटबाजी संपुष्टात आणून ऐक्याची भावना दृढ करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला.
यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि युवा नेते अक्षय कर्डीले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजप-महायुतीचा भगवा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त झाला.
बैठकीस जेष्ठ व मान्यवर नेतृत्वाची उपस्थिती लाभली. त्यामध्ये बैठकीचे अध्यक्ष जेष्ठ शिक्षक नेते श्री. विष्णू खांदवे गुरुजी, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन श्री. संभाजी पवार, मार्केट कमिटीचे संचालक श्री. सुभाष निमसे, खरेदी विक्री संघाचे संचालक श्री. बाबासाहेब काळे, मडडगावचे सरपंच श्री. साहेबराव शेडाळे, वाळुंज गावचे सरपंच श्री. मकरंद हिंगे, नारायणडोह सरपंच श्री. अमोल गुंड,सांडवे सरपंच श्री. बाप्पूसाहेब खांघेतल आठवडचे माजी उपसरपंच श्री. तुकाराम दाताळ, विद्यमान उपसरपंच श्री. शंकरराव मोरे, दशमीगव्हाणचे माजी उपसरपंच श्री. भाऊसाहेब काळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी खालील मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले मार्केट कमिटीचे माजी संचालक श्री. बाजीराव हजारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष श्री. अशोक कोकाटे, शिवसेना युवा तालुका प्रमुख सचिन ठोंबरे, माजी सरपंच सौ. अर्चना चौधरी, जेष्ठ नेते श्री. पांडुरंग ससे, श्री. बाळासाहेब ठोंबरे, शिक्षक नेते श्री. कल्याण ठोंबरे, श्री. महेश जगताप पाटील, माजी सरपंच अमोल कोकाटे, माजी उपसरपंच भाऊसाहेब ठोंबरे, माजी उपसरपंच महादजी कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य दीपक हजारे, राम खराडे, भाऊसाहेब बेल्हेकर, आदींनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
बैठकीदरम्यान बूथस्तरावर संघटन मजबूत करण्यासाठी, घराघर संपर्क वाढवण्यासाठी आणि पक्षविचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस पुढील कार्यक्रम आखण्यात आले.
एकूणच, ही बैठक चिचोंडी पाटील गणातील भाजपा-महायुतीच्या ऐक्याचे आणि ताकदीचे प्रभावी प्रदर्शन ठरली व आगामी निवडणुकीच्या रणसज्जतेचा पहिला निर्धारपूर्ण टप्पा म्हणता येईल.


