भारत सरकारच्या नोटरी पदी अँड. चेतन भाऊसाहेब रोहोकले यांची निवड*
अहमदनगर शहरातील प्रसिध्द अँड.चेतन भाऊसाहेब रोहोकले यांची भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालय, कायदेशीर कार्य विभाग, नोटरी सेलद्वारे पब्लिक नोटरी पदी निवड झाली आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तारातून अभिंनदन होत आहे, अँड. चेतन भाऊसाहेब रोहोकले हे पारनेर तालुक्यातील भाळवणी गावातील रहीवाशी असून ते नगर शहरात मागील २० वर्षापासून कर सल्लागार म्हणून ते व्यवसाय करीत आहेत १५ वर्षापासून अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयात व पारनेर न्यायालयात दिवाणी व फौजदारी वकीली करतात.ते वकिली व्यवसाय सांभाळत सामजिक आध्यातमिक उपक्रमामध्ये हिरारीने सहभागी होत असतात.ते विविध पतसंस्था बँका यांच्या पॅनलवर आहेत . सहकार प्रशिक्षण केंद्र येथील निवृत्त प्राचार्य भाऊसाहेब रामभाऊ रोहोकले यांचे ते चिरंजीव आहेत.
अँड चेतन भाऊसाहेब रोहोकले यांची नोटरी पब्लिक पदी नियुक्ती झाल्याबद्दल राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, न्याय, शैक्षणिक आणि राजकीय ,आर्थिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे
तसेच अँड चेतन भाऊसाहेब रोहोकले यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.