चोंडी येथील शेतकऱ्यांना कृषी संबंधित ॲप याची माहिती देण्यात आली* 

चोंडी येथील शेतकऱ्यांना कृषी संबंधित ॲप याची माहिती देण्यात आली
जामखेड: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय, हाळगाव येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनी “ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम- 2025-26” चौंडी येथे राबवीत आहेत. चौंडी गावामध्ये कृषि कन्या या शेतीशी निगडित विविध प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्याचाच एक भाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय हळगाव च्या कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी उद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत वेगवेगळ्या कृषी संबंधित मोबाईल ॲपचा प्रसार कसे करावे यावर मार्गदर्शन केले.
शेतीसंबंधी मोबाईल ॲप चे प्रकार त्यांना कसे वापरावे व कृषी ॲपचा शेती उत्पादनात कसा वापर करावा याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.
गावातील शेतकरी कृषी बद्दल ॲप पासून वंचित असल्याकारणाने कृषी कन्यांनी हे प्रात्यक्षिक केले.
यासह वेगवेगळे कृषी संबंधित ॲप जसे की एम एस ए एम बी, इनाम ,माय एपीएमसी, मार्केट यार्ड ॲग्री सेंट्रल ॲप , हे कृषी संबंधी ॲप कसे वापरावे त्यांच्या वापराचे फायदे देखील त्यांना सुचविले.
या प्रात्यक्षिकामध्ये कृषिकन्या प्राजक्ता कदम, श्रुती काळे, वैष्णवी खाडे, साक्षी खंडारे, मिनल कुवर यांनी शेतकऱ्यां मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. गोकुळ वामन, केंद्रप्रमुख व मृदा शास्त्र विषय तज्ञ डॉ. प्रेरणा भोसले, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. संदीप मोरे, कार्यक्रम अधिकारी व कृषि अर्थशास्त्र विषय तज्ञ डॉ. उत्कर्षा गवारे यांचे मार्गदर्शन यासाठी लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *