चोंडी येथील शेतकऱ्यांना कृषी कन्याकडून बागायती पिकांची लागवड व रचना याविषयी मार्गदर्शन लिहिलेली
जामखेड: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय, हाळगाव येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनी “ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम- 2025-26” चौंडी येथे राबवीत आहेत. चौंडी गावामध्ये कृषि कन्या या शेतीशी निगडित विविध प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्याचाच एक भाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय हळगाव च्या कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी उद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत बागायती पिकांची रचनायावर मार्गदर्शन केले. तसेच आंबा चिकू आणि पेरू या पिकांची लागवड करण्यात आली
तसेच गावामध्ये बागायती पिकांची महत्त्व जाणून घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी शासकीय महाविद्यालय हाळगावच्या कृषी कन्यांनी सोंडी येथील शेतकऱ्यांना बागायती पिक आंबा, चिकू आणि पेरू यांची योग्य रचना करत लागवड करावी. यावेळी प्रथमतः आधार रेखा आखून घेतली त्यानंतर पायथागोरसचा सिद्धांत मांडून मागणी करण्यात आली त्यानंतर एक बाय एक बाय एक मीटरचा खड्डा खोदून त्यामध्ये शेणखत टाकण्यात आले आणि आंबा ,चिकू ,पेरू या रोपांची लागवड करण्यात आली बागायती पिकांसाठी बाबांची रचना याची महत्त्व कृषी कन्या
प्राजक्ता कदम, श्रुती काळे, वैष्णवी खाडे, साक्षी खंडारे, मिनल कुवर यांनी शेतकऱ्यां मार्गदर्शन केले. सदरचे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. गोकुळ वामन, केंद्रप्रमुख व मृदा शास्त्र विषय तज्ञ डॉ. प्रेरणा भोसले, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. संदीप मोरे, कार्यक्रम अधिकारी व कृषि अर्थशास्त्र विषय तज्ञ डॉ. उत्कर्षा गवारे यांचे मार्गदर्शन यासाठी लाभले. या प्रात्यक्षिकासाठी अविनाश शिंदे, कल्याण शिंदे,हनुमंत गोरे, कुसुम गोरे, रेवंनाथ गोरे, बापू मोरे, गौतम सामसे आदी शेतकरी उपस्थित होते
चोंडी येथील शेतकऱ्यांना कृषी कन्याकडून बागायती पिकांची लागवड व रचना याविषयी मार्गदर्शन लिहिलेली*


