स्वातंत्र्यदिनी आरोग्य जागृतीची स्टार हेल्थ ची हाक..
आरोग्यविमा पॉलिसी सर्वांसाठी अत्यंतिक गरजेची
विठ्ठल लांडगे; स्टार हेल्थ कंपनीच्यावतीने शहरात जनजागृती बाईकरॅली
अहिल्यानगर : आरोग्यविषयक वाढलेल्या खर्चिक उपचार पद्धतीच्या काळात आरोग्यविमा ही समाजव्यवस्थेची अत्यंतिक महत्वाची गरज बनली आहे. त्यातही स्टारहेल्थ ही भारतातील पहिली स्वतंत्र आरोग्यविमा देणार कंपनी आहे. या कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्यसुविधा तुलनेने सर्वाधिक चांगल्या आहेत, अशी भावना अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष विठ्ठल लांडगे यांनी व्यक्त केली.
स्वात्रंत्यदिनानिमित्त स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्यावतीने काल (दि. 15) नगर शहात विमा पॉलिसीविषयी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे यांनी या रॅलीचा झेंडा दाखवून प्रारंभ केला. ज्येष्ठ पत्रकार तथा सीए ज्ञानेश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचा समारोप करण्यात आला.
नगर शहर व जिल्ह्यातील जवळपास 70 बाईकस्वार व 110 विमा प्रतिनिधी तसेच स्टारहेल्थ कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कंपनीच्यावतीने त्याचा प्रचार , प्रसार व सर्वसामान्यांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी या रॅलीचे आयोजन केले होते. या बाईकरॅलीने शहरातील विविध मार्गांवर फिरुन ठिकठिकाणी जनजागृतीसाठी आवश्यक असलेली पत्रके वाटली. तसेच यावेळी ‘घर घर तिरंगा हर घर स्टार’ हा नारा दिला. भरपावसात ही बाईकरॅली संपन्न झ्ााली.
भारतातील पहिली स्वतंत्र हेल्थ इन्शुरन्स कंपनी म्हणून स्टारहेल्थचा नावलौकिक आहे. कंपनीने ‘डॉक्टर तुमच्या दारी होम हेल्थ केअर’ ही नवीन संकल्पना राबवली आहे. कंपनीने एक टोल फ्री नंबर दिला आहे. आपल्या ग्राहकांना उलट्या, जुलाब, मळमळ, ताप, सर्दी, खोकला, अशा आजारांसाठी आता दवाखान्यात जाण्याची गरज नाही. कंपनीचे डॉक्टर आता ग्राहकाच्या घरी येऊन औषोधोपचर करणार आहेत. ही सुविधा देणारी स्टारहेल्थ ही भारतातील पहिलीच कंपनी आहे, अशी माहिती स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे येथील रिजनल हेड विक्रांत कायगावकर यांनी दिली.
कंपनीचे टॅरोटरी मॅनेजर रणजीत उजागरे, वरिष्ठ विक्री व्यवस्थापक सुहास करंडे पाटील, चंद्रशेखर तनपुरे, साहिल पाटील, विक्रम गुरावे, अभिजीत बकोरे, निलेश तोडमल, ऋषिकेश जामोदकर, नीलेश अकोलकर, राजेंद्र तनपुरे, पंकज चिंतामणी, तेजस बिचकर, मनोज लाटे, किरण काटे, धामणे नितीन, कौशल आनंद, गुगळे महेश तसेच स्वामिनी सर्व्हिसेस च्या संचालिका जया करंडे, अनुराधा मुदिगंटी, दिपाली करजकर यांनी ही जनजागृती रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
—**—


