सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन गावाचा विकास करावा – ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ (कला) महाविद्यालय कोल्हार बु. ता. राहाता जि. अहिल्यानगर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून कोल्हार बु. चे माजी सरपंच व न्यू इंग्लिश स्कूल, कोल्हार विद्यालयाचे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष मा. श्री ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील बोलत होते. आज प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी आपल्या जाती- धर्मातील समाजसुधारकास
वाटून घेतलेले आहे परंतु कोणताही युवक त्यांचे विचार आचरणात आणत नाही जर प्रत्येक युवकाने समाज सुधारकांचे विचार आचरणात आणले तर निश्चितपणे आपल्या गावाचा व देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही आपण फक्त समाज सुधारकांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करतो त्यांचे विचार ऐकतो परंतु ते विचार थोडे तरी आपण आचरणात आणावेत. याप्रसंगी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संघटना कोल्हार-भगवतीपुर यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या शुभ हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुशराज जामदार उपमुख्याध्यापक सिताराम बोरुडे पर्यवेक्षिका संजीवनी आंधळे, सुनील बोरुडे, दिलीप बोरुडे, सोपान गायकवाड, योगेश बोरुडे, हर्षद बर्डे, विष्णू बोरुडे, सुनील बोरुडे, संकेत बोरुडे, किरण ससाणे, मुस्तकीन तांडेल हे हजर होते. याप्रसंगी गणेश गमे सर व इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्बीर शेख यांनी केले व आभार श्री दीपक मगर यांनी मानले.


