पार्वतीबाई म्हस्के शाळेमध्ये आधार फाउंडेशन कडून गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप.
अहमदनगर – जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगाव ने संचलित पार्वतीबाई म्हस्के प्राथमिक विद्यालयामध्ये आमदार संग्राम जगताप व नगरसेवक संपत बारस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त आधार फाउंडेशन यांच्याकडून शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना एक हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या परिसरामध्ये संपत बारस्कर यांच्या हस्ते आंब्याच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले . अध्यक्षीय भाषणामध्ये संपत बारस्कर यांनी मुलांना चांगले शिक्षण घेण्याचे व शिक्षणाच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याविषयी मार्गदर्शन केले व शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचे आश्वासन दिले. आधार फाउंडेशन चे संस्थापक व राष्ट्रवादी युवक शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष शकील तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक विद्यार्थ्याने एक तरी झाड लावले पाहिजे व त्याचे संवर्धन केले पाहिजे. शाळेत वृक्षारोपण केलेले झाडे भविष्यात निश्चित बहरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय झगडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले . या कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित आगु , राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विनीत गाडे, युवा उद्योजक गणेश बारस्कर, देशमुख साहेब , पालक तसेच शिक्षक खिंदारे वंदना , थोरात हर्षा सोनवणे ज्योती, दिपाली नेहुल, कुलकर्णी अपर्णा , ऋतुजा सुरम इ. उपस्थित होते. सूत्रसंचालन शकील सय्यद यांनी केले तर आभारप्रदर्शन शैलजा कर्डिले यांनी केले.