विखे पाटील महाविद्यालयाच्या कृषिदूतांचे वाळुंजमध्ये स्वागत
शेतकर्यांना शेतीसंबंधी विविध विषयांवर करणार मार्गदर्शन
नगर, दि.9-महात्मा फुले कृषि विद्यापीठ संलग्न डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळदघाट येथील चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषि जागरुकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत वाळुंज गावात दाखल झाले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी वाळुंजच्या सरपंच पा. गो. हिंगे,उपसरपंच गायकवाड,तलाठी कराळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषिदूत ग्रामीण कृषि जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमासाठी आलेले असून 10 आठवडे चालणार्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या प्रात्यक्षिकांची माहिती कृषिदूत देणार आहेत. कृषिदूत सुमित गोलेकर,अभिजीत गाडे,साहिल जाधव,ओम बेंडाळे,शिवम भोर हे कृषिदूत शेतकर्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत. गावामध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करून शेतकर्यांना येणार्या अडचणी, त्यांचे ग्रामीण जीवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, नैसर्गिक साधन संपत्ती, समाजातील सामाजिक स्थिती, पीक पद्धती इ. विविध गोष्टीचा अभ्यास करणार आहेत. त्याच बरोबर शेतकर्यांनाही विविध कार्यक्रम व प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. माती व पाणी परीक्षण, विविध पिकांची लागवड तंत्रज्ञान, जिवाणू खतांचा शेतीमध्ये वापर, गांडुळखत निर्मिती, पिकांवर येणारे रोग व किडी याची माहिती व व्यवस्थापन, जनावरांची काळजी व संगोपन तसेच शेतीशी निगडित विविध समस्यांवरील उपाय, बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक अशा विविध विषयांवर शेतकर्यांना मार्गदर्शन होणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. सोमेश्वर राऊत, कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण दांगडे, प्रा. पुनम ठोंबरे व इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.


