महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते आबासाहेब पाटील सोनवणे यांचा न्यू इंग्लिश स्कूल हिंगनगांव शाळेच्या वतीने सत्कार समारंभ
नगर (हिंगणगाव ) येथील लोकनियुक्त माजी सरपंच तथा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे राज्य कोअर कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे पाटील यांचा युवा महाराष्ट्र फाउंडेशन च्या वतीने महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025 ने गौरव करण्यात आला. त्यांचा सत्कार न्यू इंग्लिश स्कूल हिंगणगाव च्या वतीने विद्यालयात घेण्यात आला .दुष्काळी गावाची ओळख पुसून त्यांनी गाव पाणीदार केले आहे, हिंगणगाव मध्ये अकरा बंधारे बांधून नदीचे नऊ किलोमीटर पर्यंतचे खोलीकरण केली आहे. नदी जोड प्रकल्प राबवला, जलयुक्त शिवार योजनेचे काम त्यांनी गावात सक्षमपणे राबवले… स्मशानभूमीचे नूतनीकरण झाडाची लागवड, गावाला जोडणारे सर्व रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण करुन गावाशी जोडले आहेत. शाळा व अंगणवाड्यासह गावातील विविध मूलभूत प्रश्न सोडवून गावचे विकासासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले*.
*या वेळी न्यू इंग्लिश स्कूल हिंगणगाव चे मुख्याध्यापक जाधव ए.डी. यांनी त्यांचा शाल श्रीफळ व फुलांचा गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक शिंदे V. N. यांनी सूत्रसंचालन केले , सुपेकर सर यांनी प्रस्तावना केली. या पुरस्काराविषयी माहिती आबासाहेब पाटील सोनवणे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना दिली.. तसेच माननीय मुख्याध्यापक जाधव सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. झावरे भाऊसाहेब यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले…यावेळी शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.