पहेलगाम हल्ल्याचा निंबळक येथे निषेध..!
प्रतिनिधी : अहिल्यानगर
नुकताच पहेलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तालुक्यातील निंबळक येथे निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी माजी पं. समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार
ॲड. राहुल ठाणगे, ज्योतिषअभ्यासक संतोष घोलप
हभप बाळकृष्ण महाराज खेसे, चांद पटेल, मारूती गायकवाड, अनिल कळसे, सुभाष कोरडे, नाना कोतकर, दादासाहेब खपके, दादा झावरे, संजय रोहकले, रामदास केतकर
आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार म्हणाले की, ‘पहेलगाम येथील झालेला हल्ला हे अमानवी कृत्य असून त्याचा सर्व भारतीयांनी एकजुटीने निषेध व्यक्त करायला हवा. आपला देश हा शांतताप्रिय असून देशाची शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी सरकारने प्रयत्न करावेत व अतिरेकयांना पाठबल देणाऱ्या पाकिस्तानला धड़ा शिकवावा .