काकासाहेब म्हस्के विद्यालयात शुध्द पेयजलचे उदघाटन
चांगल्या आरोग्यासाठी शुध्द पाणी गरजेचे- पटेल
नगर, दि. 23- सध्याच्या युगात मानवी आरोग्यासाठी शुद्ध पाणी हे महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी त्याचा वापर जपून करावा, असे आवाहन रोटरी डिस्ट्रिक्टचे जयेश पटेल यांनी केले. मांडवे (ता. नगर) येथील काकासाहेब म्हस्के माध्यमिक विद्यालयात शुद्ध पेयजल यंत्राचे उदघाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रोटरीच्या अध्यक्षा स्विटी पंजाबी, प्रसन्न खाजगीवाले, सचिव डॉ.बिंदू शिरसाठ, नंदिनी जग्गी, सरपंच सुभाष निमसे, अतुल गांधी उपस्थित होते.
पटेल म्हणाले की,रोटरी ही देशातच नव्हे तर परदेशात काम करणारी संस्था आहे.रोटरी ही शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यासाठी काम करते. काकासाहेब म्हस्के माध्यमिक विद्यालयात वॉटर प्युरिफायर यंत्रणा बसवली आहे. शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचार्यांना सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. प्युरिफायर देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर निमसे यांनी मदत केली. स्वागत गीत,पाणी वाचविणारे जलगीत आणि आरोग्याच्या फायद्यासाठी सुरक्षित पिण्याच्या पाण्याचे महत्त्व या विषयावर स्नेहल खांदवे व क्रांती बोरूडे या विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे रोटरी ई-क्लबचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमात राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. गणित दिवसाबद्दल प्रतिक डहाळे व गणित शिक्षक कल्याण ठोंबरे यांनी माहिती दिली. यावेळी संस्थेचे संचालक डॉ.प्रशांत निक्रड, गणेश शेकडे, अल्पना गांधी, शीलू मकर, बापू भुजबळ, मुख्याध्यापक दत्तात्रय गुंड, कल्याण ठोंबरे, अमोल शिलवंत, कुणाल उमाप, तुकाराम बोरुडे, अनर्थ गोवर्धन उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रद्धा खांदवे व आभार संस्थेचे सचिव सुभाष निमसे यांनी मानले.


