तालुक्याची विस्कटलेले घडी परिवर्तनाने जागेवर येईल – काशीनाथ दाते

तालुक्याची विस्कटलेले घडी परिवर्तनानने जागेवर येईल : काशिनाथ दाते 

पारनेर : ता. प्रतिनिधी 

शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ -पाबळ,

पारनेर -नगर मतदारसंघाची विस्कटलेली घडी परिवर्तनाने जागेवर आणण्याची हिच वेळ आली आहे असे प्रतिपादन काशीनाथ दाते यांनी केली. पारनेर तालुक्यातील नव्यानेच आस्तिवात आलेली घरानेशाहीला थांबवायची आहे .

 आळकुटी, म्हस्केवाडी, शिरापूर, राळेगण थेरपाळ, वडनेर बुद्रुक, परिसरातील गावांमध्ये महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते सर यांच्या गाव भेट प्रचार दौऱ्या प्रसंगी दाते सर बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती मधुकर उचाळे, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, प्रशांत गायकवाड, सचिन पाटील वराळ, वसंतराव चेडे, भास्कर उचाळे, दिनेशराव बाबर, लहू भालेकर, अशोक चेडे, संग्राम पावडे, शहाजी कवडे, कापसे सर इत्यादी मान्यवर प्रमुख उपस्थितीत होते.  यापूर्वी तालुक्यात विकासाच्या मुद्द्यावर राजकारण व्हायचे. निवडणुका होत होत्या. परंतु मागील पाच वर्षापासून तालुक्यात हा मुद्दा मागे पडून प्रसिद्धीवर निवडणूक झाली आणि त्याला आपण भुललो आणि निवडणुकीचा निकाल वेगळा लागला. यापूर्वीचे नेतृत्वाने गावाच्या राजकारणात कधी भाग घेतला नाही गट-तट पाडले नाहीत. जो विरोधात जाईल त्याला त्रास देण्याची भूमिका घेतली गेली आणि हा त्रास भविष्यात होऊ नये यासाठी आपण परिवर्तन केले पाहिजे. खासदारकीच्या निवडणुकीत विखे पाटलांवर घराणेशाहीचा आरोप करीत होते आणि आता यांनी स्वतःच घराणेशाही चालू केली आहे. म्हणून मी ही परिवर्तनाची लढाई सुरू केली आहे मला विश्वास आहे या परिवर्तनाच्या लढाईत तुम्ही माझ्या बरोबरीने निष्ठेने निर्धाराने राहणार आहे. भविष्यात आपणाला कुठलाही त्रास होणार नाही याची सर्वांना ग्वाही देतो. हे सर्व संपवायचं आहे ते दोन हात करून नाही, तर ते संपण्याचे मार्ग आहे तुम्ही परिवर्तन करा हे सर्व जागेवर येईल आणि यापूर्वीच्या नेतृत्वाने जो तालुक्यात आदर्श घालून दिला त्याप्रमाणे आपण तालुका पुन्हा फुले, शाहू, आंबेडकर, सेनापती बापट, अण्णा हजारे यांच्या विचारावर आणण्याची जबाबदारी घेऊ. राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादांनी आपल्यावर विश्वास टाकला. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब, डॉक्टर सुजय दादा विखे साहेब पाटील यांनीही अगदी मोकळ्या मनाने माझ्या उमेदवारीला होकार दिला. महायुती सरकारने गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी फार मोठं काम केलं आहे. मुलींना पहिली पासून ते पदवीधर पर्यंत शिक्षण मोफत केले आहे. तालुक्यात लाडक्या बहिणींना सरकारने योजना आणली संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा सरकारने केली आहे असेही दाते सर म्हणाले. पाबळ येथील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज कदम यांनी केले तर सर्वांचे आभार आर.एस. कापसे सर यांनी मानले.

🔸 चौकट : पाबळ येथील निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज कदम यांच्यासह अंकुश कवडे, भरत गोरडे, संतोष कवडे, रवींद्र कापसे, बाबाजी कापसे, बन्सी शेठ साबळे, अशोक कापसे, बन्शी कवडे, महेश कवडे, राहुल कवडे, संतोष कवडे या पदाधिकाऱ्यांनी उमेदवार काशिनाथ दाते यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.

🔸 चौकट : काशिनाथ दाते सर तालुक्यातील सुसंस्कृत, सज्जन, सरळ स्वभावाचे नेतृत्व आहे. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. या निवडणुकीत दाते सर विजयी होणार याची मला खात्री आहे : 

मधुकर उचाळे, माजी सभापती जिल्हा परिषद अ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *