काशिनाथ दाते यांच्या बालेकिल्ल्यालाच खिंडार !
सरपंच प्रकाश गाजरे यांचा घणाघाती आरोप
पोखरी : प्रतिनिधी काशिनाथ दाते यांचे होमग्राऊंड असलेल्या पोखरीचे सरपंच सतीश पवार, वारणवाडीचे सरपंच संजय काशिद यांनी खा .नीलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये पोखरीमध्येच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. म्हसोबा झापचा सरपंच मीच असल्याने महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या बालेकिल्ल्यालाच खिंडार पडल्याचे म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी सांगितले. गाजरे म्हणाले, ज्या टाकळी ढोकेश्वर गटाचे दाते हे नेतृत्व करत आहेत त्या गटामध्ये आज काय राजकीय परिस्थिती आहे ? गटातील एकूण २२ ग्रामपंचायतीपैकी १७ ग्रामपंचायतीचे सरपंच पोखरीमध्ये पार पडलेल्या टाकळी ढोकेश्वर गटाच्या प्रचार सभेस उपस्थित होते. प्रचारसभेची गद पाहिली तरी टाकळी ढोकेश्वर आता कोणाचा बालेकिल्ला आहे याची प्रचिती येते. अलिकडेच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकीत खा. नीलेश लंके यांनाच आघाडी होती. पाच वर्षापूर्वीच्या विधानसभेलाही नीलेश लंके यांचाच वरचष्मा होता. आता यावेळच्या विधानसभा निवडणूकीतही राणी लंके यांचे मताधिक्य नीलेश लंके यांच्या मागील दोन निवडणूकांपेक्षाही अधिक असणार असल्याचा दावा सरपंच गाजरे यांनी केला. गाजरे म्हणाले, खा. नीलेश लंके हे २४ तास ३६५ दिवस नागरीकांच्या सुख, दुःखात सहभागी होतात. त्यांचा निवडणूकीपुरताच नव्हे तर संपूर्ण पाच वर्षे मतदारसंघाशी संपर्क असतो. विरोधक मात्र निवडणूकीमध्ये उमेदवारी मिळाल्यानंतर भुत्रासारखे उगवले असून त्यांना मतदारांची साथ कशी मिळेल ? कोरोना संकटात संपूर्ण मतदारासंघाबरोबरच ज्याला कोरोनाची बाधा झाली त्याला खा. नीलेश लंके यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जिवदान दिले. कोरोना संकटात आज दारामध्ये मते मागण्यासाठी येणारे उमेदवार कुठे होते ? त्यांनी किती रूग्णांना आधार दिला याचे उत्तर त्यांनी प्रथम द्यावे असे आव्हान गाजरे यांनी दाते यांना दिले आहे.
▪️चौकट
दहा हजारांची आघाडी देणार
टाकळी ढोकेश्वर गटामध्ये कोटयावधी रूपायांची विकास कामे राबविणाऱ्या खा. नीलेश लंके यांनी गेल्या पाच वर्षात नागरीकांसाठी वैयक्तीक लाभाच्या योजनाही राबविल्या आहेत. मतदारसंघातील प्रत्येक नागरीकांचा खा. लंके यांच्याशी थेट संपर्क असल्याने नागरीकांना लंके कुटूंब आपलेसे वाटते. त्यामुळेच गेल्या पाच वर्षांपासून टाकळी ढोकेश्वर गट लंके यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे. त्याच बळावर हा गट राणी लंके यांना १० हजार मतांची आघाडी देणार आहे.
▪️चौकट
लंके यांचे शिलेदार सज्ज
लोकसभा निवडणूकीमध्ये खा. नीलेश लंके यांचे जीवाभावाचे सहकारी लोकसभा मतदासंघातील विविध तालुक्यांमध्ये महिनाभरापासून ठाण मांडून होते. त्यामुळे गावागावांमध्ये त्यांचे दुर्लक्ष झाले. आता मात्र लंके यांचे शिलेदार आपल्या गावाची तटबंदी राखण्यासाठी सज्ज असून राणी लंके या मतदासंघातील जिल्हा परिषदेच्या सर्व गटांमध्ये मोठे मताधिक्य घेऊन विक्रमी मतांनी विजयी होतील.
प्रकाश गाजरे
सरपंच, म्हसोबा झाप