शिवराष्ट्र सेनेचा आमदार जगताप यांना पाठिंबा.
आ. जगताप यांनी शहर विकासाचे स्वप्न साकार केले.
अहिल्यानगर-गेल्या दहा वर्षाच्या काळात आमदार जगताप यांनी आमदारकीच्या माध्यमातून नगर शहराचा सर्वांगीण विकास केला. एक विकसित शहर हे त्यांचे स्वप्न त्यांनी साकार करून दाखवल आहे .नगरच्या जनतेने जर त्यांना पाठबळ दिलं नसतं तर हे अशक्य झाले असते. स्वप्नातील आणखीन सुंदर शहर जर आपल्याला पुन्हा एकदा पाहायचं असेल तर आपल्या सर्व नगरकरांची साथ असल्याशिवाय शक्य होणार नाही. आज शिवराष्ट्र सेनेने आ. जगताप यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे त्यांचे हात अजून बळकट होतील त्या माध्यमातून ते हॅट्रिक केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन आ. अरुण काका जगताप यांनी केले.
नगर शहराचा विकास आ. संग्राम जगताप यांनी केलेलाच आहे. त्यात आणखीन भर पडावी अजून विकसित शहर व्हावे यासाठी या भावनेतून शिवराष्ट्र सेनेच्या पक्षाच्यावतीने असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आमदार अरुण काका जगताप यांच्या उपस्थितीत सेनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित दादा पवार गटाचे अधिकृत उमेदवार आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यात आला यावेळी शिवराष्ट्र सेनेचे राकेश सारवान ,शंभुराजे नवसुपे ,संतोष त्रंबके ,मानेस औशिकर ,सतीश खैरे, दत्ता वामन ,जय बोरा ,कुणाल बैल, आनंद बग्गण, प्रवीण बाग्गण, बाबा करपे ,संजय सुगंधी ,देविदास रायकर, अनुप गांधी, पुनम शिंदे ,कमल ,पैठणे ,सुमन दळवी ,माधुरी बागडे, उमा छजलानी ,वैशाली सावंत आदी उपस्थित होते.