शिवसेनेचे बंडखोर उमेदवार प्रा . शशिकांत गाडे यांचा कळमकर यांना पाठिंबा
नगर शहरातील राजकारणात नवे वळण : महाआघाडीत पुन्हा एकजुट
खा निलेश लंके यांची यशस्वी शिष्टाई
केडगाव : अहिल्यानगर शहर विधानसभा निवडणुकीत काल घडलेल्या अर्ज माघारीच्या नाट्यमय घड़ामोडीनंतर आज ( मंगळवारी ) पुन्हा राजकीय ट्विस्ट पाहयला मिळाला . महाआघाडीतुन बंडखोरी केलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा . शशिकांत गाडे यांनी आज महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक कळमकर यांना पाठिंबा जाहिर केला .
यावेळी खा . निलेश लंके , माजी आमदार दादाभाऊ कळमकर , माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम , विक्रम राठोड , कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे उपस्थीत होते . यावेळी प्रा. गाडे म्हणाले की , माघारीचा अर्ज चुकुन कार्यकत्यांच्या हातात राहिला . दुसरा अर्ज लिही पर्यत वेळ संपली . मात्र आता अभिषेक कळमकर यांना पाठिंबा देत असुन स्वतः उमेदवार समजुन सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत . खा . निलेश लंके यांनी महाआघाडीची एकजुट ठेऊन नगर शहर दहशत मुक्त करण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याची विनंती केली . यावेळी बाळासाहेब बोराटे , योगिराज गाडे उपस्थीत होते