श्रीगोंदा मतदार संघातचर्चा फक्त तिरंगीचीच

चर्चा फक्त तिरंगीचीच

श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात अनेक उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ अनेक राजकीय घडामोडींनी सतत चर्चेत राहिला आहे.महायुती भाजपा कडून प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाचपुते कुटुंबीयांनी उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत उमेदवारी विक्रमसिंह पाचपुते यांना देण्याची मागणी केली होती.अखेरच्या टप्प्यात प्रतिभा पाचपुते यांनी उमेदवारी मागे घेण्याचा दिलेला इशारा दिल्याने विक्रमसिंह पाचपुते यांच्या नावावर भाजपाकडून शिक्कमोर्तब करण्यात आले.

दुसरीकडे अनपेक्षित घडामोडी घडत मविआ कडून हा मतदार संघ शिवसेनेकडे जात अनुराधा नागवडे यांचा शिवसेना प्रवेश आणि उमेदवारी जाहीर झाली. माविआ इच्छुक राहुल जगताप यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. राष्ट्रवादीची मोठी ताकद असतानाही हा मतदार संघ शिवसेना उबाठा कडे गेल्याने राहुल जगताप समर्थक संतप्त झाले त्यांनी राहुल जगताप यांच्याकडे अपक्ष उमेदवारी करण्याची मागणी केली. मतदार संघात राहुल जगताप यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट उसळलेली पाहून राहुल जगताप यांनीही निवडणुकीत उडी घेतली. घनश्याम शेलार यांनी अचानकपणे प्रहारची उमेदवारी मागे घेतली यासह अण्णासाहेब शेलार यांची वंचित कडून उमेदवारी तसेच १महिन्यांपासून फिक्स उमेदवार म्हणत सुवर्णा पाचपुते यांनी गावोगावी केलेली पोस्टरबाजी अशा अनेक घडामोडी या मतदार संघात घडल्या. 

श्रीगोंदा मतदार संघ हा श्रीगोंदा आणि नगर तालक्यातील २ जिल्हा परिषद गट यांचा मिळून तयार झाला आहे.पण सद्या मतदार संघात विक्रमसिंह पाचपुते (कमळ), राहुल जगताप ( रोड रोलर) आणि अनुराधा नागवडे (मशाल )अशा तिरंगी लढतीत चर्चा सुरू आहे.या निवडणुकीत नगर तालुक्यातील गावे महत्त्वपूर्ण भूमिका निभवणार आहेत.नगर तालक्यात शिवसेना उबाठा आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची ताकद आहे. शिवाय बबनराव पाचपुते आणि राहुल जगताप याचे काही कार्यकर्तेही या भागात आहेत.

नगर तालुक्यातील शिवसेना काय भूमिका घेते हे पहाणे महत्वाचे आहे. कारण अहिल्या नगर शहर आणि पारनेर मधे शिवसेनेला उमेदवारी न मिळाल्याने शिवसैनिक नाराज आहेत ते प्रामाणिकपणे अनुराधा नागवडे यांच्या सोबत रहातात की वेगळी भूमिका घेतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे .कर्डिले समर्थक राहुरी मतदार संघातील निवडणुकीत व्यस्त आहेत ते विक्रमसिंह पाचपुते यांना साथ करतात की राहुल जगताप यांना साथ करतात यावरही अनेक राजकीय गणिते मांडली जात आहेत.पण नगर तालुक्यातही तिरंगी लढतीचीच चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *