आदर्शगाव हिवरे बाजार राष्ट्र निर्माणाची प्रयोगशाळा

आदर्श गाव हिवरे बाजार राष्ट्रनिर्माणाची प्रयोगशाळा – 

                          राममोहन मिश्रा केद्रीय सचिव जलसंपदा विभाग

हिवरे बाजार :-आज दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी विशेष निवडणूक निरीक्षक पदी अहिल्यानगर पदी नेमणूक झालेले श्री.राममोहन मिश्रा यांनी आदर्श गाव हिवरे बाजारला भेट दिली आणि संपूर्ण विकास कामांची पाहणी करून पद्मश्री पोपटराव पवार यांनी सविस्तर माहिती सांगितली.तसेच त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

मिश्रा पुढे बोलताना म्हणाले,हिवरे बाजार येथे पंचायतीच्या पुढाकारातून व ग्रामसभेच्या पाठबळातून केलेल्या विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गावातील दारद्रीय व स्थलांतर थांबले आणि पाणी,माती व पर्यावरणाचा विचार या गावात होतो आहे म्हणून हिवरे बाजार हि राष्ट्रनिर्माणाची प्रयोगशाळा आहे असे मत त्यांनी मांडले.हिवरे बाजार येथे झालेल्या विकासकामाची यशोगाथा(case study) आय.आय.एम.,आय.आय.टी.,मसुरी प्रशिक्षण केंद्र याठिकाणी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी ठेवण्यास सांगितले.प्रशिक्षणातून काम समजते परंतु अंतरमनातील प्रेरणा महत्वाची असून ती मला हिवरे बाजारमध्ये मिळाली.सन २००७ हिवरे बाजारला प्रथम राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला तेव्हा ते जलसंपदा मंत्रालयाचे सचिव होते.

यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशजी ओला, संचालक मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन रफिक नाईकवडी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,नायब तहसीलदार अनिल तोरडमल,सहा.पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते,मेजर शिवाजी पालवे, सरपंच विमल ठाणगे,चेअरमन छबुराव ठाणगे,व्हा चेअरमन रामभाऊ चत्तर,बाबासाहेब गुंजाळ,एस.टी.पादीर,रो.ना.पादीर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *