एकलव्य सेनेचा शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा

एकलव्य सेनेचा शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा

राहुरी (प्रतिनिधी) –
एकलव्य सेना या अदिवासी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी भाजपा व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
यावेळी एकलव्य आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी म्हटले आहे की, राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील तमाम अदिवासी समाजाने कर्डिले यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. कर्डिले जेव्हा या मतदार संघाचे आमदार होते त्यावेळी अदिवासी समाजाचे अनेक सामाजिक व विधायक कामे त्यांनी मार्गी लावले आहेत. त्यामध्ये घरकुले, जातीचे दाखले, रेशन कार्ड, अदिवासी मुलांना शिष्यवृत्ती, महिला बचत गटांना भरघोस मदत तसेच अनेक गरजू नागरिकांना मदत केली आहे. याची जाणीव आदिवासींना आहे. मागील वेळी समोरील उमेदवाराच्या भूलथापांना बळी पडून आदिवासी समाजाने सदर उमेदवाराला पाठींबा दिला होता. परंतु गेल्या पाच वर्षामध्ये आदिवासिंचे कोणतेही कामे झाली नाही त्यामुळे सर्व आदिवासी समाजाने जाहीर पाठींबा देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा एकमुखीने निर्णय घेतला आहे. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे, जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा सचिव मुरलीधर अहिरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *