गोरक्षनाथ लांडगे यांना मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित

गोरक्षनाथ लांडगे यांना मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित

अहमदनगर – नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील प्रगतशील शेतकरी गोरक्षनाथ लांडगे यांना भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली यांच्यावतीने शेतीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावरील मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला कृषी जागरण आणि कृषी संशोधन परिषद व महेंद्रा ट्रॅक्टर यांच्या संयुक्त पणे आयोजित दिल्ली येथील पुसा कॅम्पस मध्ये केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्या उपस्थित मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला लांडगे हे मागील काही वर्षापासून प्रयोगशील शेती करत आहेत आज देशांमध्ये जे काही अन्न धान्य फळे व भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे त्यावर मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशके व रासायनिक बुरशीनाशके यांचा रोग व किड नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे त्यामुळे अन्न धान्य फळे भाजीपाला यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल अंश येत आहेत त्याचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत आहेत आज भारतीय तसेच जागतिक बाजारपेठेमध्ये केमिकल अंश विरहित अन्नधान्य फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध आहे परंतु त्या प्रमाणात फळे व अन्नधान्य मिळत नाही या सर्व गोष्टीचा विचार करून लांडगे यांनी कांदा या पिकामध्ये एकात्मिक पद्धतीने सेंद्रिय खते जिवाणू खते रासायनिक खते यांचा योग्य वापर करून मातीचे आरोग्य जपले त्याचबरोबर पिकावरील कीड नियंत्रणासाठी जैविक कीडनाशके व रोग नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशके यांचा वापर करून केमिकल अंश विरहित तसेच युरोपियन स्टॅंडर्ड नुसार मोठ्या प्रमाणात निर्यात योग्य असे कांदा उत्पादन घेतले या सर्व गोष्टीचा विचार करून भारतीय कृषी संशोधन परिषद ने पुरस्कारासाठी गोरक्षनाथ लांडगे यांची निवड करण्यात आली जैविक शेती करण्यासाठी ज्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले असे बायोमिचे सीईओ जैव रसायन शास्त्रज्ञ डॉक्टर प्रफुल्ल गाडगे सर भारत विघ्ने सर उमेश सर यांच्या प्रयत्नामुळे केमिकल अंश विरहित कांदे उत्पादन घेता आले पुरस्कार मिळाल्याबद्दल पिंपळगाव लांडगा ग्रामस्थांच्या वतीने वाघेश्वरी ऍग्रो मिल्क प्रा लि चे चेअरमन दीपक लांडगे संजीवनी पतसंस्थेचे चेअरमन गुलाबराव लांडगे दैनिक लोक आवाजचे संपादक विठ्ठल लांडगे भैरवनाथ फार्मर्स कंपनीचे राजेंद्र लांडगे व दत्तात्रय कुमटकर ऑडिटर पांडुरंग लांडगे जी स पी क्राप सायन्स कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट राजेंद्र लांडगे वि का चे चेअरमन साहेबराव किसान मोर्चा चे तालुका अध्यक्ष महेश लांडगे मोहम्मद शेख दिनकर लांडगे पारगाव चे माजी सरपंच शिवाजी शिंदे शरद बडे पिंपळगाव लांडगा कृषी सहाय्यक सौ नांगरे मॅडम या सर्वांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *